scorecardresearch

भजनाच्या कार्यक्रमात चाहत्यांनी पाडला पैशांचा पाऊस; स्टेजवर नोटांचा ढीग, Video व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक लोक मोठ्या प्रमाणात नोटा उधळताना दिसत आहेत.

kirtidan gadhvi bhajan viral video news
सध्या सोशल मीडियावर गुजरातमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातमधील वलसाड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये गुजराती लोक गायक कीर्तिदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहेत. शिवाय त्यांनी इतक्या नोटा उधळल्या आहेत की त्या ठिकाणी अक्षरश नोटांचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

गायक कीर्तिदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन वलसाड अग्निवीर गौ सेवा दलाने शनिवारी ११ मार्च रोजी केले होते. यावेळी भजन रंगात आले तसं गायकाच्या अंगावर काही लोकांनी नोटांची उधळण केली. या घटनेचा व्हिडिओ ANI ने ट्विट केला आहे. एएनआयने ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये, गायक हार्मोनियम वाजवत भजन गाताना दिसत आहे. त्याच्या व्यासपीठासमोर पांढरे शर्ट घातलेले कही लोक १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. ते इतके नोटा उधळत आहेत की हळूहळू संपूर्ण स्टेज नोटांनी भरल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही पाहा- Video: “ही आमची जमीन…” कन्नडमध्ये बोलली नाही म्हणून रिक्षा चालकाने तरुणीला खाली उतरवलं अन्…

हेही पाहा- “टॉयलेटमध्ये पाणी नाही, २ तास…” प्रवाशाने ट्विटद्वारे मांडली अनोखी व्यथा, रेल्वेने दिले उत्तर; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

गुजरातमध्ये संगीताच्या कार्यक्रमामध्ये पैशांची उधळण करण्याची प्रथा सामान्य आहे. कारण या पुर्वीदेखील गुजरातमध्ये अशा प्रकार पैशांची उधळण केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून तो ६१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, या लोकांजवळ खूप पैसा आहे. तर आणखी एकाने “या ठिकाणी ईडी आणि आयकर विभागाचे अधिकारी जाणार आहेत का?” असा प्रश्न विचारला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 17:43 IST