ऑम्लेट हा अनेकांचा आवडता नाश्ता असतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणातील इतर पदार्थ येत नसले, तरी ऑम्लेट मात्र बनवता येतेच. कारण ऑम्लेट बनवणे अगदी सोपे असते आणि ते पटकन बनवता येते. ते बनवण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील पद्धत पाहून तुम्हीही चकित व्हाल. काय आहे ही पद्धत जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘इटिंग फूड रेसेपिज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क चिप्सच्या पाकिटात ऑम्लेट तयार केल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक लेसचे चिप्सचे पाकीट घेऊन त्यातील वेफरचे बारीक तुकडे करण्यात आले. त्यानंतर त्यात अंडे फोडुन टाकण्यात आले, कांदा आणि मिठही टाकण्यात आले. सगळ्या गोष्टी नीट मिसळण्यात आल्या, त्यानंतर पॅकेटला एक चिमटा लावण्यात आला. नंतर हे पॅकेट उकळत्या पाण्यात ठेवण्यात आले आणि त्यात थोड्या वेळाने ऑम्लेट तयार झाले. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: थंडीने हुडहुडणाऱ्या शेळीसाठी या चिमुकल्याने काय केले एकदा पाहाच; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: हे प्राणी आहेत की माणसं? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक अनोखी पद्धत दिसत आहे. पण या पद्धतीवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केले आहे, चिप्स पॅकेटसाठी वापरण्यात येणारा कागद आरोग्यासाठी चांगला नसल्याचे तसेच या पॅकेटच्या स्वच्छतेबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food bloggers idea of cooking omelette in lays packet is now viral see what netizens have to say on this video pns
First published on: 09-12-2022 at 20:40 IST