Premium

पती, पैसा अन् मर्डर…पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट; कॉफीमध्ये मिसळले ‘ब्लीच’, घटनेचा VIDEO आला समोर

Shocking video: पत्नीने आपल्याच पतीच्या हत्येचा भयानक कट रचला

Footage shows Arizona woman allegedly pouring bleach into her US Air Force husband’s coffee
पतीच्या हत्येचा भयानक कट (Photo: @TheWakeninq)

Viral video: अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये एका पत्नीने आपल्याच पतीच्या हत्येचा भयानक कट रचला. खरंतर या जोडप्याचे घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. पत्नीचे पतीसोबत अनेकदा मतभेद होत होते. दरम्यान या भांडणाला कंटाळून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. ही सगळी घटना पतीने किचनमध्ये लावलेल्या गुप्त कॅमेरात कैद झाली आणि याचा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पतीनं रचला पतीच्या हत्येचा कट

विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये घटस्पोटाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रागाच्या भरात हल्ली लोक टोकाचं पाऊल उचलतात, अशी एक घटना अमेरीकेत घडली. आपापसातील वादातून पत्नीने थेट नवऱ्याला संपवण्याचाच डाव आखला. या घटनेत ३९ वर्षीय मेलोडी फेलिकानोने यूएस एअरफोर्समध्ये काम करणाऱ्या पती रॉबी जॉन्सनला त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळून मारण्याचा प्रयत्न केला आणि हे एकदा नाही तर अनेक वेळा केले. पती रॉबी अनेकदा जर्मनी आणि ऍरिझोना येथे ड्युटीवर तैनात असायचा. या दरम्यान, त्याची पत्नी मेलडी हिने त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच टाकण्याचा कट रचला. मेलडीला वाटले की तिचा कट कधीच उघड होणार नाही. मात्र, रॉबी या बाबतीत अतिशय हुशार आणि सावध निघाला. त्याने किचनमध्ये गुप्त कॅमेरा बसवला होता. ही संपूर्ण घटना या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जॉन्सनची मार्च २०२३ मध्ये जर्मनीमध्ये पोस्टींग मिळाली, तेव्हापासून पत्नी मेलोडी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळत होती.

कॉफीमध्ये मिसळायची ब्लीच

पती जॉन्सनला सुरुवातीला याची कल्पना नव्हती मात्र, दिवसेंदिवस कॉफीच्या टेस्टमध्ये त्याला बदल आढळून आला. त्यानंतर जॉन्सनच्या मनात त्याची चाचणी करण्याचा विचार आला. त्याने लगेचच केमिकल टेस्टिंग स्ट्रिप्स विकत घेतल्या. जेव्हा त्यांनी कॉफी मेकरची कसून तपासणी केली तेव्हा त्यांना आढळले की नळाचे पाणी सामान्य असले तरी त्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त आहे. क्लोरीनचा शोध घेतल्यानंतर त्याला धक्काच बसला. हा सिलसिला बराच काळ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्नीने कॉफीच्या भांड्यात अनेक वेळा रसायन मिसळले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> संतापजनक! “तुम्ही आता मेलात” वासुदेवाच्या वेशात आलेल्यांना सिंधुदुर्गात गावकऱ्यांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

प्रॉपर्टीसाठी पतीला संपवण्याचा कट

या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पत्नी कॉफी पॉटमध्ये ब्लीच मिसळताना दिसत आहे. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, जॉन्सन म्हणतात की त्याच्या पत्नीने त्याच्याकडून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी, पैशासाठी हे सगळं केलं आहे. ऑनलाइन रेकॉर्डनुसार, मेलडीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तिच्यावरील आरोपांसाठी तिला $250,000 च्या बाँडवर तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Footage shows arizona woman allegedly pouring bleach into her us air force husbands coffee maker video viral srk

First published on: 02-10-2023 at 09:40 IST
Next Story
Video : वाढदिवस साजरा करण्यासाठी सहलीला गेलेल्या कुटुंबाची अस्वलाबरोबर थरारक भेट…