scorecardresearch

VIDEO: “माझी बायको आणि गर्लफ्रेंडमुळेच मी ‘मॅन आॅफ द मॅच’ झालो”

हा हे लाईव्ह टीव्हीवर बोलला!

VIDEO: “माझी बायको आणि गर्लफ्रेंडमुळेच मी ‘मॅन आॅफ द मॅच’ झालो”
अरे काय हे?

फोटोमध्ये दिसणारा हा माणूस खपलाय. म्हणजे टोटली गेलाय तो!

एरव्ही एखाद्या मॅचमध्ये ‘मॅन आॅफ द मॅच’ अवाॅर्ड मिळाला म्हणजे तो क्षण त्याच्यासाठी किती आनंदाचा असतो. आपण आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली,आपल्या टीमला जिंकून दिलं, या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला या सगळ्याची नोंद घेतली गेली आहे अशीच भावना त्या प्लेअरच्या मनात असते. मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यांच्या समोर हा अवाॅर्ड दिल्यावर त्या खेळाडूचा अभिमानाने ऊर किती भरून येतो. रोजरोज काही सगळ्या जगासमोर बोलायची संधी मिळत नाही. मग ‘मॅन आॅफ द मॅच’ अवाॅर्ड मिळाल्यावर आपल्या मनातल्या भावना सगळ्यांना सांगायची संधी मिळते.

पण हा ‘खिलाडी’ भावनेच्या जरा जास्तच आहारी गेला आणि बघा काय बोलला ते

सौजन्य- यूट्यूब

‘माझ्या या यशाचं श्रेय मी माझ्या बायकोला आणि गर्लफ्रेंडला देतो’ असं हा पठ्ठ्या आनंदाच्या भरात बोलून गेला.

त्याची प्रतिक्रिया सुरू होताना आपण पुरस्कार जिंकल्याचा आनंद त्याच्या शब्दाशब्दातून ओसंडत होता. पण हे गर्लफ्रेंड प्रकरण बोलल्यावर त्याची हवाच गेली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय ते.

या सार्वकालिक महान खेळाडूचं नाव आहे मोहम्मद अनस. तो आफ्रिका खंडातल्या घाना या देशातला फुटबाॅलपटू आहे. साऊथ आफ्रिकेमधल्या फुटबाॅल लीगमध्ये तो एका टीमतर्फे खेळतो. ‘फ्री स्टेट स्टार्स एफ सी’ या क्लबकडून खेळणाऱ्या अनसने या मॅचमध्ये दोन गोल्स लगावल्यावर त्याचा मॅन आॅफ द मॅच पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आणि कदाचित आपल्या आयुष्यातल्या अतिशय आनंदाच्या क्षणी त्याने हास्यास्पद चूूक केली.

काय येडा आहे. ‘बाॅईज् प्लेड वेल’, ‘बाॅईज् प्लेड वेल’ असं तीनचारदा बोलून आला असता तरी काम भागलं असतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2017 at 19:43 IST

संबंधित बातम्या