scorecardresearch

फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने आपलं इंस्टाग्राम अकाऊंट युक्रेनच्या डॉक्टरकडे सोपवलं; काय आहे नेमकं कारण?

फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने आपले ७१.५ दशलक्ष फॉलोअर्स असलेले इंस्टाग्राम खाते युक्रेनियन डॉक्टरकडे सुपूर्द केले आहे.

David Beckham Instagram
(फोटो: Reuters and davidbeckham / Instagram )

डेव्हिड बेकहॅमने एका युक्रेनियन डॉक्टरला त्याचे इंस्टाग्राम खाते दिले, ज्याला ७१.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. याच्यामागे एक खास कारण आहे आणि ते म्हणजे रशियन आक्रमणादरम्यान वैद्यकीय व्यावसायिकांना कोणत्या अडचणी येत आहेत हे अधोरेखित करणे. युनिसेफच्या राजदूताने त्यांचे इंस्टाग्राम खार्किवमधील प्रसूती केंद्राचे प्रमुख डॉ. इरीना यांच्याकडे सुपूर्द केले. युक्रेनियन लोक दररोज तोंड देत असलेले भीषण वास्तव दाखवण्यासाठी आणि देणग्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे इंस्टाग्राम खाते वापरले जाईल.

या इंस्टाग्राम खात्यावर धक्कादायक व्हिडीओ आणि फोटोंमध्ये नवजात बालके आणि रुग्णांवर तळघरात कसे उपचार केले जातात. बाल भूलतज्ज्ञ, इरिना आणि इतर वैद्यकीय व्यावसायिक गर्भवती महिलांना सुरक्षितपणे जन्म देण्यास मदत करत होते.

एका फुटेजमध्ये प्रसूती बंकर दर्शविला आहे. इरीनाने तिच्या आयुष्यातील एक दिवस दर्शकांना दाखवला आहे. इरीना म्हणाली की ती आता ‘२४/७’ काम करते आणि व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या महिन्यात युक्रेनवर आक्रमण केले त्या दिवशी तिने माता आणि गर्भवती महिलांना तळघरात हलवण्यात तीन तास घालवले.

हृदयद्रावक बाब म्हणजे, अतिदक्षता विभागात असलेल्या सर्व बाळांना केंद्राच्या मुख्य भागात राहावे लागते कारण ते हलवता येत नसलेल्या उपकरणांवर अवलंबून असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Footballer david beckham has handed over his instagram account to a ukrainian doctor know reason ttg

ताज्या बातम्या