Cursed chair: खुर्ची हे व्यक्तीच्या बसण्यासाठीचे उत्तम साधन आहे. या खुर्चीवर बसून व्यक्ती विश्रांती घेतो. पण एक खुर्ची अशीही आहे की, एकदा त्या खुर्चीवर व्यक्ती बसला की, तो परत कधीच येत नाही. त्याचा मृत्यू होतो. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल मात्र हे खरं आहे. एक खुर्ची अशीही आहे जी तिच्या विचित्र रहस्यामुळे चर्चेत राहिली आहे. चला चर जाणून घेऊयात या शापित खुर्चीचे रहस्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शापित खुर्चीचे रहस्य

अठराव्या शतकात इंग्लंडमधील थर्स्क येथे थॉमस बस्बी नावाचा एक माणूस राहत होता. त्याचा डॅनियल ऑटी नावाचा एक खास साथीदार होता. हे दोघेही खोटी नाणी बनवण्याचे बेकायदेशीर काम करायचे. डॅनियल हा थॉमसचा अत्यंत चांगला मित्र तर होताच. पण, थॉमसने डॅनियलची मुलगी एलिझाबेथशी लग्नही केले होते. ज्यानंतर दोघे जावई-सासरे झाले. पुढे ही मैत्री आणखीनच घट्ट होत गेली. रोज काम संपल्यावर हे दोघे थर्स्क येथील त्यांच्या आवडत्या बारमध्ये एकत्र दारु प्यायला बसायचे आणि तिथे भरपूर मद्यपान करायचे.

थॉमस या बारमध्ये नेहमी एकाच खुर्चीवर बसत होता. जी त्याला खूप आवडत होती. जर त्या खुर्चीवर दुसरं कुणी बसलं तर थॉमस भांडण करत होता. पण पुढे जाऊन ही खुर्ची किती लोकांचा जीव घेणार आहे याचा कुणालाच अंदाज नव्हता. ही कथा १७०२ मध्ये सुरू होते. एके दिवशी एका बारमध्ये थॉमस आणि डॅनियल यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. मग डॅनियल थॉमसला चिडवण्यासाठी त्याच्या आवडत्या खुर्चीत बसला. हे पाहून थॉमसला इतका राग आला की, त्याने डॅनियलची हत्या केली.

(आणखी वाचा : वेगळं दिसण्यासाठी कायपण! संपूर्ण शरीरावर टॅटू काढत बनवला विश्वविक्रम; पाहा ‘या’ जोडप्यानं नेमकं काय केलं? )

…अन् खुर्ची झाली शापित

पोलिसांनी हत्येच्या आरोपात थॉमसला अटक केली. ज्यानंतर सासऱ्याच्या हत्येबाबत थॉमसला मृत्यूदंड देण्यात आला. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली. तेव्हा थॉमस म्हणाला की, त्याला त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसून जेवण करायचं आहे. थॉमसची ही इच्छा मानली गेली आणि त्याला बारमध्ये नेण्यात आलं. जेवण केल्यावर तो उभा झाला आणि म्हणाला की, ‘जो कोणी माझ्या खुर्चीत बसण्याची हिंमत करेल तो मरेल’. तेव्हापासून ही खुर्ची शापित झाली आहे, असं म्हणतात.

दोन पायलटचा झाला मृत्यू

दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल एन्फोर्सर्सचे दोन पायलट त्या बारमध्ये आले आणि त्याच शापित खुर्चीवर बसले. त्यानंतर ते दोघे बारमधून बाहेर येताच त्यांच्या कारला अपघात झाला आणि दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. यानंतर या खुर्चीवर जी कोणती व्यक्ती बसली त्याचा गूढ मृत्यू झाला. या वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे बार मालकाने ही खुर्ची गोडाऊनमध्ये ठेवून दिली. मात्र, इथेही या खुर्चीने लोकांचा जीव घेतला.

एकदा गोदाममध्ये एक मजूर थकल्यानंतर त्या खुर्चीवर बसला. नंतर एक तासांनंतर एका रोड अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बार मालकाने ही खुर्ची एका म्युझिअमला दान केली. तेव्हापासून ५ फूट उंचीवर ही खुर्ची लटकवण्यात आली आहे. जेणेकरून चुकूनही यावर कुणी बसू नये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For 320 years this cursed chair has been kept in the museum and the person who sat on it died pdb
First published on: 24-11-2022 at 13:51 IST