शाळेतील शिक्षकाचा डान्स पाहून हॉलिवूड स्टारही थक्क, पाहा २ कोटी लोकांनी पाहिलेला VIRAL VIDEO

सध्या सोशल मीडियावर एका शाळेतील शिक्षकाच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये हा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत ठुमके लावत असल्याचं दिसून येतंय.

teacher-dance-video-viral
(Photo; Twitter/ Bruce_Cares)

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. यातील काही व्हिडीओ तर अतिशय मजेदार असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ हे प्राणी, पक्षी तर काही व्हिडीओ हे माणसांच्या करामतीचे असतात. सध्या सोशल मीडियावर एका शाळेतील शिक्षकाच्या डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये हा शिक्षक विद्यार्थ्यांसोबत ठुमके लावत असल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतल्या फ्रेस्नो शहरातील तेनाया मिडल शाळेचा आहे. हा व्हिडीओ फक्त नेटकऱ्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटींना सुद्धा आवडलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये धांसू डान्स करणाऱ्या शिक्षकाचं नाव ऑस्टिन लेमे असं आहे. या शिक्षकाचा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स पाहून सारेच त्याचे फॅन झाले आहेत. शाळेच्या एका साप्ताहिक मेळाव्यात सर्व विद्यार्थी एकत्र डान्स करत होते. त्याचवेळी या शिक्षकाच्या काळातलं आवडतं गाणं वाजू लागलं आणि त्यानंतर हा शिक्षक स्वतःला आवरू शकला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत हा शिक्षकही आपल्या आवडत्या गाण्यावर चांगलाच ठेका धरू लागले.

शाळेत नेहमीच धडे शिकवणारे शिक्षक सुद्धा आपल्यासोबत डान्स करत असल्याचं पाहून शाळेतील विद्यार्थीही त्याच्यासोबत नाचू लागले. या व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थी या शिक्षकाच्या डान्स स्टेप्सची कॉपी करतानाही दिसत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO: “तुम्ही दंड आकारू शकता…पण मारू शकत नाही!” ८ वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने त्याला कानशिलात लगावली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : हे काय? चक्क एअरपोर्टवरच मॉडेलने न्यूड होऊन केलं असं काही की पाहून व्हाल हैराण…

एक टिकटॉक युजरने शिक्षकाचा हा धम्माल डान्स आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला. रविवारी सकाळी जेव्हा या शिक्षकाने आपला व्हिडीओ टिकटॉकवर पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावेळी जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. बघता बघता या व्हिडीओला काही वेळानंतर एक कोटी व्ह्यूज आणि आता या व्हिडीओला तब्बल दोन कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या’ भावंडांचा नवा VIDEO VIRAL ; कतरिना कैफच्या ‘Tip Tip Barsa Paani’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

हा व्हिडीओ सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. फक्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांनाच नव्हे तर आयर्लंड बाल्डविन, ख्रिस ब्राउन आणि अगदी स्नूप डॉग सारख्या सेलिब्रिटींना देखील हा व्हिडीओ खूप आवडला आहे. या व्हिडीओखाली कमेंट करत लोकांनी शिक्षकाच्या डान्सचं कौतुक केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fresno teacher shows off impressive dance moves for students in viral video tiktok omg news america teacher dance video goes viral prp

Next Story
VIRAL : हे काय? चक्क एअरपोर्टवरच मॉडेलने न्यूड होऊन केलं असं काही की पाहून व्हाल हैराण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी