मुसळधार पावसाने सर्वत्र चांगलाच धूमाकूळ घातला आहे. नद्याची पातळी धोकादायकरित्या वाढली असून अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्राजवळच्या वस्त्या आणि सोसट्यांमध्ये पाणी शिरले आहे. नद्यांवरील पुल देखील पाण्याखाली गेले आहे. एकीकडे अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे तर दुसरीकडे काही लोक स्वत:चा जीव धोक्यात टाकून पुराच्या पाण्यात उतरताना दिसत आहे. असाच एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण नदीच्या प्रवाहात दुचाकी घेऊन उतरला आहे, त्याचा मित्र त्याला पाण्यात जाऊ नको सांगत आहे पण शेवटी जे काही होते ते पाहून अंगावर काटा उभा राहील. पुराच्या पाण्यात वाहून गेली दुचाकी, थोडक्यात वाचला त्याचा जीव (mans bike was swept away in the flood water is life was saved briefly) इंस्टाग्रामवर roadsafetycontent नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसते एका रस्त्यावर नदीचं पाणी आले आहे. बहुधा हा नदीचा पुल असावा. पाण्याची पातळी इतरी वाढली आहे की पुल दिसत देखील नाही. दरम्यान या पाण्यात एक तरुण बाईकवर बसून उतरला आहे. त्याचा मित्र त्याला पाण्यात न जाण्याची विनंती करतो तरीही तो ऐकत नाही. दुचाकी घेऊन तो नदीच्या पाण्यात उतरतो…काही अंतर पुढे जातो आणि अडकतो. पाण्याचा प्रवाह इतका जोरात असतो की त्याला दुचाकी पुढे नेता येत नाही. शेवटी त्याच्या हातातून दुचाकी निसटते आणि पाण्याबरोबर वाहून जाते. दुचाकी पकडण्याच्या नादात हा तरुणही पाण्यात वाहून गेला असता पण त्याचा मित्र पुन्हा त्याला ओरडून सांगतो की दुचाकी नंतर शोधून देतो, तू परत ये, तुझा जीव वाचव. एक पाऊल पुढे टाकलस तर पाण्यात बुडशील. मित्रा परत ये…"व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. व्हिडीओवर मजकूर लिहिलेला दिसत आहे ज्यामध्ये असे सांगितले आहे की, आयुष्यात लोक देव बनून मदतीसाठी धावत येतात. आपण त्यांच्या शब्दाचा मान ठेवला पाहिजे. वाहन चालवताना तुमची एक चूक तुमचं आणि इतरांच कुटुंब उध्वस्त करू शकते. " हेही वाचा - कशी होते मुंबईची तुंबई? ठाण्यात बसमध्ये शिरले पाणी, विरारमध्ये चक्क साचलेल्या पाण्यात उतरवली नाव, पाहा Viral Video हेही वाचा - भुकेल्या चोरट्यांची विचित्र चोरी; लाखोंचे दागिने चोरी करण्यापूर्वी केले ‘हे’ काम गाडी घेऊन पुराच्या पाण्यात उतरणाऱ्या तरुणाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल (Internet users of trolled bike rider) व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन पुराच्या पाण्यात गाडी नेणाऱ्या तरुणाला ट्रोल केले आहे. व्हिडीओवर एकाने कमेंट केली की, त्याला पकडून बेदम चोप द्यायला पाहिजे होते, कुठून अंगात मस्ती चढते एवढी काय माहिती?"मित्राची एवढी तळमळ पाहून "हे प्रेम फक्त गावाकडच बघायला मिळत"तिसरा म्हणाला की, धोकादायक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते हा चांगला बोध आहे.