Friendship Day 2024 Wishes in Marathi: प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र किंवा मैत्रीण असते ज्याबरोबर आपण सर्व काही गोष्टी शेअर करु शकतो. आई-वडिलांमुळे आपली रक्ताची नाती तयार होतात. पण मैत्रीचे नाते माणूस स्वत: निर्माण करतो. स्वत:ला आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर तो मैत्री करतो. त्यामुळे मैत्रीला सर्वात मौल्यवान नाते मानले जाते. या अनमोल नात्याचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. यंदा भारतात ४ जुलै रोजी ‘फ्रेंडशिप डे’ (Friendship Day 2024) साजरा केला जाणार आहे. याच ‘फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रिय मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअप, टेक्स मेसेजच्या माध्यमातून खास मराठीतून शुभेच्छा संदेश, कोट्स आणि इमेजेस पाठवू शकता.

फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश (Happy Friendship Day Wishes in Marathi)

१) वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध
फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

Janhavi Killekar
“जान्हवीने वेळेत पलटी मारली हे…”, आधीच्या पर्वातील सदस्याचे वक्तव्य चर्चेत, “मला ती..”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi
Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi : गणपती विसर्जनाच्या मित्रमैत्रिणींना द्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटसला ठेवा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Amchya Papani Aanla Ganpati song sung by the little one
लाडक्या बाप्पासाठी चिमुकल्याने गायले “आमच्या पप्पांनी गणपती आणला”गाणे, गोंडस हावभाव बघून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू, पाहा Viral Video
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
chinchpoklicha chintamani aagman sohala 2024 chintamani aagman sohala date and time Senior Police Inspector dadar appeal to ganeshbhakt
VIDEO: गणेशभक्तांनो चिंतामणीच्या आगमनाला जाताय? थांबा! आधी दादरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केलेलं आवाहन पाहा
Riteish Deshmukh
“रितेश देशमुख ‘लैय भारी’ होस्ट, त्यांच्या स्टाईलने…”, आधीच्या पर्वातील ‘या’ सदस्याने केले भरभरून कौतुक
swapna waghmare joshi home thief arrested
मराठी दिग्दर्शिकेच्या घरातून चोरी केलेल्या पैशांचे घेतले अमली पदार्थ, चोरट्याला पोलिसांनी केली अटक

२) रक्ताची नसूनही रक्तात भिणते ती मैत्री
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

३) मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा
कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

४) मन मोकळेपणाने आपण ज्याच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो,
आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री….
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Friendship Day 2024 Wishes)

५) जीवन आहे तिथे आठवण आहे
आठवण आहे तिथे भावना आहे
भावना आहेत तिथे प्रेम आहे
प्रेम आहे तिथे मैत्री आहे
जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहे
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

६) दुनियादारीमध्ये आम्ही थोडे कच्चे आहोत,
पण दोस्तीमध्ये एकदम सच्चे आहोत
आमचे सत्य फक्त यावरच कायम आहे की
आमचे मित्र आमच्यापेक्षाही खूप चांगले आहेत !!!
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

७) स्नेहाचं हे बंधन असंच अतुट रहावं
आपण असंच जीवनभर मैत्रीचं गाणं गुणगुणावं
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

८) गाण्याला मैफलीची गरज असते
प्रेमाला ह्रदयाची गरज असते
दोस्तांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे
कारण मित्रांची गरज प्रत्येक क्षणाला असते
हॅप्पी फ्रेंडशिप डे!

९) आज काल आमच्यावर जळणारे खूप आहेत
त्यांना आता जळू द्या
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू द्या…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

१०) लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…
लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…
लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो

फ्रेंडशिप डे कोट्स (Friendship Day Quotes In Marathi)

१) जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल त्याच्या भीतीने सावध राहतो तो मित्र नाही- गौतम बुद्ध

२) मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन

३) मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात… – व.पू. काळे

४) मैत्री ही परिस्थितीचा विचार करत नाही, जर असे तर समजून घ्या की, ती मैत्री नाही. -मुन्शी प्रेमचंद

५) जो व्यक्ती सर्वांचा मित्र असतो, तो कधीच कोणाचा मित्र नसतो हे लक्षात ठेवा, कारण जो व्यक्ती ज्याला घाबरतो त्यावर तो कधीच प्रेम करत नाही – अरस्तु

फ्रेंडशिप डे व्हॉट्सअप स्टेटस (Friendship Day Whatsapp Status)

१) दोन गोष्टी सोडून मैत्री करा
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा

२) आम्ही वेळ घालवण्यासाठी मैत्री करत नाही
मित्रासाठी वेळ घालवतो.

३) कोण म्हणत मैत्री बरबाद करते
जर निभावणारे कट्टर असतील ना तर
सारी दुनिया सलाम करते

४) फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमवून ते जतन करणे महत्वाचे आहे, मैत्री….

५) मैत्री म्हणजे कुंडली न जुळवता आयुष्यभर साथ देणार एक नातं…