Frog – Snake Viral Video : निसर्गात अनेकदा अशा काही घटना घटना घडतात, ज्या खरंच फार अद्भुत असतात. त्या पहिल्यांदा पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. वन्यप्राण्यांच्या जगात दररोज काही ना काही घडत असते; पण जेव्हा यातील काही घटना आपण पाहतो तेव्हा त्या फारच आश्चर्यकारक वाटतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण- त्यात एक बेडूक चक्क सापाची शिकार करताना दिसतोय.
लहानपणापासून आपण सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं आहे की, साप हा नेहमी बेडकाची शिकार करतो. तलावाजवळ किंवा शेताजवळ बेडूक दिसताच साप त्याला भक्ष्य बनवतो. मात्र, हा व्हायरल व्हिडीओ याच्या पूर्णपणे उलट आहे. यावेळी शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका बदललेल्या पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये एक मोठा बेडूक एका लहान सापाला तोंडात धरून हळूहळू गिळण्याचा प्रयत्न करतोय.
सापाची सुटका करण्यासाठी धडपड
व्हिडीओच्या सुरुवातीला साप स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडताना दिसतोय. बेडकाच्या तोंडातून तो बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतो; तो फणा पसरवून पूर्ण ताकद लावताना दिसतोय. परंतु, यादरम्यान बेडूक आपली पकड अजिबात सैल होऊ देत नाही. पाहता पाहता, बेडूक हळूहळू सापाला संपूर्ण गिळून टाकतो. हे दृश्य इतकं भयानक आहे की, जे पहिल्यांदा पाहताना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं अवघड होतं.
हा भयानक व्हिडीओ @NayiSochHQ नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला निसर्गाचं सर्वांत आश्चर्यकारक दृश्य म्हटलं आहे; तर काहींच्या मते, जंगलाचे नियम माणसाच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे असतात. अनेकांनी गमतीनं “आज सापाचा दिवस वाईट होता” अशी कमेंट केली आहे; तर काहींनी याला निसर्गाच्या संतुलनाचा पुरावा मानलं आहे.
हा व्हिडीओ पुन्हा एकदा सिद्ध करतो की, निसर्ग कधीही ठरावीक नियमांवर चालत नाही. इथे कोण कोणाची शिकार करेल, याचा अंदाज लावणं अत्यंत कठीण असतं. हीच अनिश्चितता वन्यजीवांच्या विश्वाला अधिक मनोरंजक आणि थरारक बनवते.
