scorecardresearch

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची मुंबई ते लंडनपर्यंत आहेत आलिशान घरे, जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती किती?

या अभिनेत्रीकडे लंडनमध्ये एक सुंदर ७ बेडरूमचा लक्झरी अपार्टमेंट आहे, ज्याचे नाव ‘राज महल’ आहे.

lifestyle
शिल्पा आणि राज यांचा मुंबईत किनारा नावाचा सुंदर सी- फेसिंग व्हिला आहे. (photo: indian express)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. आज त्यांच्या दोघांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. शिल्पा शेट्टी चित्रपटांमध्ये तसेच टीव्ही शोज जज करत असताना, राज हा टीएमटी ग्लोबल, विआन इंडस्ट्रीज आणि जेएल स्ट्रीम प्रायव्हेट लिमिटेड यासह अनेक कंपन्यांचा मालक आहे. यासोबतच त्यांची मुंबईत रेस्टॉरंट्सही आहेत. आज या जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगत आहोत की त्यांची एकूण संपत्ती किती आहे.

मुंबईत सी- फेसिंग घर

शिल्पा आणि राज यांचा मुंबईत किनारा नावाचा सुंदर सी- फेसिंग व्हिला आहे. शिल्पा अनेकदा तिच्या आलिशान व्हिलाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या व्हिलामध्ये तिचे दोन्ही मुले मुलगा विआन आणि मुलगी समिषासोबत राहते.

लंडनमधील ७ बेडरूम व्हिला

बातम्यांनुसार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याकडे लंडनमध्ये एक सुंदर ७ बेडरूमचा लक्झरी अपार्टमेंट आहे, ज्याचे नाव ‘राज महल’ आहे.

खाजगी विमान

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत सामील आहेत ज्यांच्याकडे खाजगी जेट आहे. अभिनेत्री आणि तिचा नवरा अनेकदा त्यांच्या जेटमधून फोटो शेअर करत असतात. सुट्टीसाठी ते अनेकदा त्यांच्या प्रायव्हेट जेटने बाहेर फिरायला जातात.

तीन कोटींची अंगठी

बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींच्या यादीत शिल्पा शेट्टीचा समावेश होतो, ज्यांची एंगेजमेंट रिंग खूप महाग असते. मिळालेल्या माहितीनुसार शिल्पाच्या एंगेजमेंट रिंगची किंमत ३ कोटी रुपये आहे.

बुर्ज खलिफा मध्ये अपार्टमेंट

यासोबतच त्यांच्याकडे देश विदेशात अनेक अपार्टमेंट्स आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ मध्ये राज यांनी बुर्ज खलिफामध्ये १९व्या मजल्यावर एक आलिशान फ्लॅट विकत घेतला होता, ज्याची किंमत सुमारे ५०कोटी रुपये होती. मात्र, नंतर त्यांनी हा फ्लॅट विकल्याच्या बातम्या समोर आल्या.

कार

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडे एक नाही तर लॅम्बोर्गिनी एव्हेंटेटरसह अनेक महागड्या कार आहेत. या कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये आहे. याशिवाय शिल्पा-राज अनेक महागड्या वस्तूंचे मालक आहेत. अहवालानुसार, दोघांची एकूण संपत्ती जवळपास २,६०० कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2021 at 11:54 IST

संबंधित बातम्या