scorecardresearch

‘या’ बेडकाची Idea वापरली असती तर.. Titanic चा जॅक वाचला असता! हा तुफान Viral Video पहाच

अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका ट्विटर युजरने शेअर केलेल्या या क्लिपला १३ मिलियन व्ह्यूज आहेत.

‘या’ बेडकाची Idea वापरली असती तर.. Titanic चा जॅक वाचला असता! हा तुफान Viral Video पहाच
'या' बेडकाची Idea वापरली असती तर..(फोटो: संग्रहित)

तुम्हाला तो टायटॅनिक सिनेमाचा शेवटचा सीन आठवतो का? जेव्हा रोझ चा जीव वाचवण्यासाठी जॅकने स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता तिला लाकडी फळीवर बसवले तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले होते. अगदी कितीही वेळा पाहिला तरी हा सीन नेहमीच डोळ्यांच्या कडा भिजवून जातो. खरंतर अशाच धाटणीचा पण तरीही अगदी मजेशीर असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका ट्विटर युजरने शेअर केलेल्या या क्लिपला १३ मिलियन व्ह्यूज आहेत.

सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहणे हा अनेकांसाठी तणावातून मुक्त होण्याचा मार्ग असतो. आज आपण अशाच दोन मजेशीर बेडकांचा व्हिडीओ पाहणार आहोत. या व्हायरल क्लिप मध्ये एक बेडूक प्लॅस्टिक बॉटलच्या झाकणावर बसलेला दिसतोय तर दुसरा बेडूक पाण्यातून बाहेर येत त्या झाकणावर बसण्याचा प्रयत्न करतोय. पण हा झाकणावरील बेडूक सरळ लाथ मारून त्या दुसऱ्या बेडकाला उडवून लावतो. यामध्ये बेडकाचा मस्त स्वॅग पाहून नेटकरी खुश झाले आहेत.

बघा बेडकांचा टायटॅनिक

डबल चीन वर उपाय शोधायला गेली अन.. पाल होऊन आली! या महिलेच्या बाबत घडलं असं काही की…

या व्हिडिओवर अनेकांनी “जर जॅकने असं डोकं चालवलं असतं तर तो वाचला असता” अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या आहेत. तर हा व्हिडीओ पाहून माझा दिवस फार आनंदी जाणार आहे असेही काहींनी म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या