Funny Answer Sheet: परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात महत्वाचा भाग असतो. या परीक्षेत विद्यार्थी अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नांना चमत्कारीक उत्तर देत असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच प्रश्नाचे उत्तर व्हायरल होत आहे. हे उत्तर वाचून तुम्हालाही धक्का बसणार आहे. तुम्हाला हासावे की खेद व्यक्त करावा, हे समजणार नाही. या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून काही दिवसांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. शाळेत काही विद्यार्थी असे असतात, जे खूप छान पेपर लिहून चांगल्या मार्क्सने पास होतात. पण, काही अतरंगी विद्यार्थी असेदेखील असतात जे पेपरमध्ये काहीही लिहितात. अनेकदा अशा विद्यार्थांचे पेपर सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. दरम्यान, आता नुकताच असाच एक फोटो व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यानं लिहलेलं उत्तर वाचून हसून हसून लोटपोट व्हाल.लहान मुलं ही देवाघरची फूलं असतात. त्यांचं मनही अगदी खरं असतं. पण कधीकधी मुलांच्या डोक्यात काय सुरू आहे, याचा अंदाज लावणं कठीण असतं. असंच एका शाळेतल्या विद्यार्थ्यासोबत झालं आहे. मुलांच्या उत्तरपत्रिकेत त्यांची गमतीशीर उत्तरंही समोर येतात. नुकतीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे, जी वाचून तुम्ही पोट धरून हसाल.

मुल शाळेत परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहतात तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही तर काही उत्तरे लिहून निघून जातात. मात्र, असे काही विद्यार्थी आहेत जे वेगळच काहीतर लिहीतात.अशाच एका विद्यार्थ्याला ” ३५० ला एक डझन आंबे आले आहेत, तर एक आंबा कसा पडला? असा प्रश्न विचारला होता. यावर त्यानं पिशवी फाटली असेल असं उत्तर लिहलंय. हे वाचून काहीवेळ शिक्षकही गोंधळले असणार हे नक्की. तुम्हीही हे वाटून पोट धरुन हसाल. यामध्ये ३५० ला एक डझन आंबे आले आहेत, तर एक आंबा कसा पडला? म्हणजेच एका आंब्याची किंमत किती असा प्रश्न होता. मात्र या विद्यार्थ्यानं शब्दश: अर्थ घेऊन त्याच उत्तर लिहलं.

पाहा उत्तरपत्रिकेचा फोटो

हेही वाचा >> अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल

या मुलाचे हे उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिलं आहे की, “लहान आहे तो त्याने प्रश्न जसा समजला तसं उत्तर लिहलं”. तर दुसऱ्याने लिहिले की, मुलगाही खूप हुशार दिसतो. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे