Wife Funny Dancing Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. त्यात हल्ली डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असाच एक हटके डान्सचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय, ज्यात रागावलेल्या पतीला शांत करण्यासाठी त्याची समजूत घालण्यासाठी बायको चक्क रस्त्यावर बिनधास्तपणे नाचताना दिसतेय. आपल्या पतीला हसवण्यासाठी त्याचा राग शांत करण्यासाठी ती ‘उफ् क्या रात आयी है’ गाण्यावर एकटीच नाचतेय.
व्हायरल व्हिडीओत पत्नीने आपल्या पतीचा राग घालवण्यासाठी वापरलेली ही पद्धत पाहून सर्वच चकित झाले. कारण- ती रस्त्याच्या अगदी मधोमध नाचू लागली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पत्नी ‘उफ् क्या रात आयी है’ गाण्यावर अत्यंत उत्साहाने नाचताना दिसतेय. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोकही आश्चर्यचकित झाले आणि थांबून तिच्याकडे पाहू लागले. सोशल मीडिया युजर्सनाही पत्नीची ही अनोखी स्टाईल खूप आवडली आहे. तर काही जण एखाद्याचा अशा प्रकारेही रुसवा घालवता येऊ शकतो हे पाहून चकित झाले.
भररस्त्यात बायकोचा डान्स अन् नवरा झाला शांत!
बायको रस्त्यावरच नाचतेय; पण तरी तो हे पाहून निघून जात असतो. मग बायको त्याच्यासमोरच जाऊन बिनधास्तपणे नाचू लागते. एकापेक्षा एक भारी स्टेप्स करत ती नवऱ्याचा राग शांत करण्याचे प्रयत्न करते. आजूबाजूचे लोक बघतायत हे पाहून अखेर नवरा राग विसरतो आणि अशा प्रकारे तिचे प्रयत्न फळाला येतात.
थोड्या वेळाने पतीचा राग शांत होतो आणि तो नॉर्मल होतो. हाच क्षण या व्हिडीओला इतका खास बनवतो. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करीत असून, त्यावर विविध प्रतिक्रियाही देत आहेत. काही जण याला एक प्रेमळ कृती म्हणत आहेत; तर काही जण याला एक मजेशीर आणि हटके पद्धत असल्याचे म्हणत आहेत.
