पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ रोजी पुणे मेट्रो प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी स्वत: मेट्रोमधून प्रवास करत नागरिकांना प्रवासासाठी मेट्रो खुली करून दिली. यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्रचंड उत्साह दाखवत पहिल्याच दिवशी मेट्रोतून प्रवासासाठी मोठी गर्दी केली. पुण्यातील पाच तर पिंपरी-चिंचवडमधील सात किलोमीटर अंतरात मेट्रोची धाव सुरू झाली. दोन्ही शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्याचा आनंद नागरिकांना आहेच आणि ते प्रवासीसंख्येवरूनही दिसून येत आहे. पण या मेट्रो प्रवासातही पुणेरी इंगा काही सुटला नाही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला असून यात पुणेरी बाणा दिसत आहे.

नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर रील तयार करणाऱ्या युवकांनी मेट्रोतील परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक प्रवाशांना प्रवासाबद्दल काय वाटतं असं विचारण्यात आलं. त्यापैकी एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एक ज्येष्ठ नागरिक मेट्रोतून पहिल्यांदा प्रवास करत होते. नेमकं त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तुम्हाला हसू रोखता येणार नाही. पुणेरी अपमान कसा असतो? ते हा व्हिडीओ पाहिल्यावर दिसून येतं.

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी मजेशीर कमेंट्सदेखील दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, हा खरा पुणेरी माणूस आहे. त्याने रील बनवणाऱ्याला जागा दाखवून दिली. तर दुसऱ्याने लिहीलं आहे की, दुपारी १ ते ४ मध्ये मेट्रो सुरु असते का? हा प्रश्न विचारा.