Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणे म्हटलं की अर्थात पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोटधरून हसाल. विशेष म्हणजे ही पाटी चक्क देवाच्या मूर्तीच्या बाजूलाच लावली आहे. त्यामुळे त्याची जास्तच चर्चा होतेय.

“आमच्या येथे पोह्यांमध्येच काय…”

ही पुणेरी पाटी कृष्णाच्या मूर्तीच्या बाजूला लावली आहे. देवळात किंवा मूर्तीच्या बाजूला, मूर्तीला स्पर्श करु नका, अंतर ठेवा असे फलक पाहायला मिळतात. मात्र सरळ भाषेत सांगतील ते पुणेकर कसले. अशाच पुणेकरानी लावलेली ही पाटी सध्या व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं काय लिहलं आहे? तर या पाटीवर “आमच्या येथे पोह्यांमध्येच काय तर देवासमोरील दिव्यामध्ये सुद्धा सनफ्लॉवर रिफाईन्ड तेलच वापरले जाते.” असा मजकूर लिहला आहे. हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे.

पाहा पुणेरी पाटी

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धी