Baby Elephant Funny Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही नेम नाही, अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ फार व्हायरल होतात. अनेकदा ते शिकारीचे असतात. पण, काही वेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यातून त्यांची हळवी, खोडकर, चपळ, निरागस बाजू पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं अवघड झालं आहे.

त्याचं घडलं असं की, हत्तीच्या पिल्लाने आयुष्यात पहिल्यांदाच डमी हत्तीला पाहिले, यानंतर त्याला काय करू नी काय नको असं झालं, तो गोंधळून गेला. एखादं लहान मूल जसं पहिल्यांदा आरशात पाहिल्यानंतर निरागसपणे हसतं, नवलं असल्यासारखं पाहतो तसं पाहू लागतं, यावेळी हत्तीच्या पिल्लाचा तो निरागस भाव आणि गोंडसपणा लोकांना फार भावला, ज्यामुळे हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होतोय.

माणूस असो वा प्राणी प्रत्येकाची एक हळवी, प्रेमळ आणि निरागस बाजू असते. माणसातील निरागस, खोडकर बाजू आपण पाहतो; पण प्राण्यातील खोडकर, निरागसपणा सहसा पाहायला मिळत नाही. पण, या व्हिडीओत तुम्हाला हत्तीच्या पिल्लाचा निरागसपणा, खोडकरपणा पाहता येईल, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.

डमी हत्तीला पाहून खऱ्या हत्तीचं पिल्लू झालं आनंदी उत्साही

व्हिडीओत पाहू शकता, एका गार्डनमधील डमी हत्तीला पाहून खऱ्या हत्तीचं पिल्लू उत्साही होते. ते त्या डमी हत्तीशी आपल्यापैकीच हा कोणीतरी आहे अशाप्रकारे त्याच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करतो, कधी सोंडेने कुरवाळत, कधी मान डोलवत तो त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला खेळायला कोणीतरी पार्टनर भेटला याप्रकारे तो त्या डमीला खेळता करतोय, हत्तीच्या पिल्लाच्या या निरागसतेने आता सर्वांचीच मनं जिंकली आहेत. अनेकजण पिल्लू फारचं गोंडस असल्याचे म्हणतायत.

हत्तीच्या पिल्लाचा हा व्हिडीओ @-chutiyapa नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हत्तीचे एक पिल्लू फिरत-फिरत लहान मुलांच्या गार्डनमध्ये शिरले, यावेळी तिथे त्याला डमी दिसला. तो डमी हत्ती खराच हत्ती समजून ते पिल्लू मान हलवत त्याच्याशी खेळू लागले, संवाद साधू लागले. दरम्यान, या व्हिडीओवरही लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, हे फार निर्मळ, निरागस दृश्य आहे, दुसऱ्याने लिहिले की, हत्तीचं पिल्लू फार क्यूट आहे. तिसऱ्याने लिहिले की, मला वाटतं त्याला मित्राची फार गरज आहे.