सोशल मीडियावर सतत मांजरीचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडीओमध्ये मांजरींची गोंडस मस्ती पहायला मिळते, तर, काही व्हिडीओमध्ये इतर प्राण्यांसोबतची लढाई दिसून येते. काही मांजरींचे व्हिडीओ पाहून तर हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर मांजरीचा असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सोफ्यावर छान साखरझोपेत दिसतोय. यादरम्यान मांजर तिथे येऊन जे काही करते ते अतिशय मजेशीर आहे. आपल्या मालकाला उठवण्यासाठी मांजरीने जी पद्धत वापरली आहे, ती पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओसाठीची तुमची उत्सुकता आणखी न वाढवता या मांजरीची करामत आम्ही तुम्हाला सांगतो. मांजर तिच्या मालकासोबत असं नक्की काय करते हे कळल्यानंतर लोक दिलखुलासपणे हसू लागले आहेत. या व्हिडीओमध्ये एक मालक सोफ्यावर गाढ झोपेत असताना अचानक मांजर त्याला एका मागोमाग एक कानशिलात मारते. होय. यावर तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. आपल्या मालकाला झोपेतून उठवण्यासाठी मांजर त्याला लागोपाठ कानाखाली मारताना दिसतेय. कधी त्याच्या कपाळावर जोरजोरात फटके मारतेय, तर कधी गालावर चापट मारतेय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या गाडीतून थेट दुसऱ्या गाडीमध्ये गेला आणि पुन्हा पहिल्या गाडीवर आला, पाहून सारेच थक्क

कल्पना करा, साखरझोपेचा आनंद घेत असलेल्या या मालकाला जेव्हा मांजरीकडून असा फटक्यांचा मारा मिळाल्यानंतर त्याची अवस्था काय झाली असेल. साधी कल्पना जरी केली तरी आपल्याला हसू आवरत नाही. मग प्रत्यक्ष हा व्हिडीओला पाहिल्यानंतर तर लोक अक्षरशः जमिनीवर लोळून लोळून हसू लागले आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर @twikocheng नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा : TMC च्या Mahua Moitra आणि त्यांची ‘Luis Vitton Bag’ ट्विटरवर करतेय ट्रेंड, वाचा मजेदार ट्विट

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : महापुरात अडकलेल्या हत्तीला वाचवले, सात तासांच्या बचाव मोहिमेचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया शेअर करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny video cat slaps the person many times viral on social media prp
First published on: 04-08-2022 at 20:46 IST