Funny video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसाव की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे जी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही.
दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. मात्र मुळात त्यांना यावेळी कशाचेच भान नसते. त्यांना स्वत:लाही धड सावरता येत नाही. अशाच एका काकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ कोकणातला असून कोकणतल्या हळदीच्या रात्रीचा हा व्हिडीओ आहे. यावेळी हळदीला “माझी पहिलाशी होती तुव नजर रूप तुझ हाय गो जबर.तुझी बघुनशी पतली कंबर कालीज माझ करते धडधड” हे गाणं लागलेलं आहे. यावर सर्वच नाचताना दिसत आहेत. दरम्यान या ठिकाणीच नाचण्याचा प्रयत्न करणाऱ्या काकांच्या डान्सनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. काकांनी दारू प्यायलामुळे त्यांना धडधड उभंही राहता येत नाहीये मात्र तरीही त्यांना नाचण्याचा मोह आवरत नाहीये. यावेळी त्यांच्या एक एक स्टेप्स पाहून तुम्हालाही हसू येईल. शेवटी एक तरुण नाचताना काकांच्या अंगावर येतो, यावेळी काका थोडक्यात पडता पडता वाचतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ghumeshwar_mh06नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये प्रत्येक गावात एक असा डान्सर असतोच असं लिहलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी मात्र या संपूर्ण प्रकाराची मजा घेत आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.