Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे. जी देशी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही. यावेळी पोलिसांनी या व्यक्तीला पकडलं असून त्यानं दारू पिऊन गाडी चालवली आहे का याचा तपास करताना तो असं काही करतो की पोलीसंही हात जोडतात. या दारुड्याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की…
दारू पिऊन गाडी चालवणे हा दंडनीय अपराध आहे. मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ मद्यपान करून वाहन चालविण्यास प्रतिबंधित करते आणि हे कृत्य दंडनीय गुन्हा बनवते. काही लोक मद्यपान करून वाहन चालवतात, अशावेळी त्यांचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि अपघात होतो. या अपघातात एखाद्या माणसाचा नाहक बळी जातो. असाच एक ट्रकचालक दारु पिऊन गाडी चालवत होता, यावेळी त्याला पोलिसांनी पकडलं आणि ब्रेथलाइझरद्वारे त्याची ड्रिंक अँड ड्राइव्ह टेस्ट घेतली. पण तो व्यक्ती पोलिसांपेक्षाही हुशार निघाला. त्यानं अशी टेस्ट दिली की पाहून पोलिसांनाही घाम फुटला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलिसांनी त्याला अडवलं आणि नियमाप्रमाणे त्याची तपासणी केली. त्याला ब्रेथलायझरमध्ये फुंक मारायला सांगितलं. पण ट्रक चालक फुंक मारण्याऐवजी भलतंच काहीतरी करू लागला. पोलिसांनी त्याला फुंक कशी मारायची हे चार-पाच वेळा दाखवलं, पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. मात्र, हा व्हिडीओ पाहून स्पष्ट दिसतंय की ट्रक चालक खूपच हुशार आहे. आपण दारु प्यायलोय हे कळू नये म्हणून तो मला अशीच फूक मारायला येते हो साहेब असं म्हणत नाटक करतोय. हे पाहून पोलीसही हसू लागले आणि शेवटी पोलिसांनीही या व्यक्तीसमोर हात टेकले.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ amarkatariaofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.