आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय राहणे जवळजवळ अशक्य झाले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तर लोकांना घरी बसलेल्या मोबाईल चाळण्याशिवाय करमतच नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असून आपलं डोलं त्यात घातलेलं असतं. घरात काय चाललंय, याकडे त्यांचं लक्ष नसतं. आपल्या व्यक्तित्वाचा अविभाज्य अंग बनलेल्या मोबाईलच्या व्यसनापायी कशातच लक्ष राहत नसल्याची तक्रार होत असते. याचेच एक उदाहरण म्हणून सध्या एक व्हिडीयो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवणार नाही, हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आई आरामात पलंगावर बसून मोबाईल बघत आहे आणि समोरच्या वॉकरमध्ये मुलाला डोलवत आहे. एकीकडे आपल्या बाळाला डोलवत दुसरीकडे ती पूर्णपणे मोबाईलमध्ये गुंतलेली दिसून येत आहे. काही वेळाने तिची नजर वॉकरकडे जाते. त्यानंतर त्या वॉकरमध्ये अगदी डोकावून पाहते तर त्यात आपलं बाळच नसल्याचं तिच्या लक्षात येतं. हे पाहून तिच्या पायाखालची जमिन सरकते आणि ताबडतोब जागची उठून ती घरभर आपल्या बाळाला शोधू लागते. त्यानंतर जे घडतं ते पाहणं खूप मजेदार आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Narendra Modi ANI
“…तर देशभरात मोठा गदारोळ माजेल”, स्वतःच्या डीपफेक व्हिडीओचं उदाहरण देत पंतप्रधान मोदींचं AI बद्दल वक्तव्य

बाळाला वॉकरमध्ये टाकून आई विसरली
या व्हिडीओमध्ये मोबाईलमध्ये गुंतलेली आई स्वत: मुलाला वॉकरमध्ये बसलेलं समजून त्याला पायाने डोलवत आहे आणि स्वत: मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात व्यस्त आहे. जेव्हा तिची नजर वॉकरकडे जाते, तेव्हा मूल तिथे नाही हे पाहून आई घाबरते आणि त्याला इकडे तिकडे शोधू लागते. घाबरलेली आई जेव्हा दुसऱ्या हाताकडे वळते तेव्हा बाळ तिच्या हातातच दिसतं. ती आनंदाने मुलाचे चुंबन घेऊ लागते. तेही ठीक आहे, पण मुलाला हातात धरून कोणी विसरता येईल का?

आणखी वाचा : सिगारेट पेटवत विषारी सापाजवळ पोहोचली मुलगी, मग काय झालं पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Viral Hack च्या मदतीने चिकट पदार्थांचं असं करा मोजमाप, ​​कसे ते जाणून घ्या?

अवघ्या १४ सेकंदांचा हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आतापर्यंत तुम्ही चष्मा, रुमाल, पाकीट, चाव्या ठेवायला विसरत होता, पण आता मोबाईलच्या नादात बाळही विसरली…’ हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाइक केला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका युजरने लिहिले की, “घोर कलियुग आले आहे, देवा”, दुसर्‍या युजरने म्हटले की, “हा फक्त हसण्याचा विषय नाही, ही एक मोठी समस्या बनत आहे.”