Funny video: झोका खेळायला कोणाला आवडत नाही. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने लहानपणी झोका खेळण्याचा आनंद घेतला असेल. गावी झाडच्या फांदीला झोका बांधून मनसोक्त झोका खेळण्याचा आनंद अनेकांनी घेतला असेल. शहरात बागेमध्ये आजही लहानमुले झोका खेळताना दिसतात. झोका खेळण्याची आता नवा ट्रेंड आला आहे. आजकाल अनेक पर्यटन स्थळी उंच डोंगरावर, खोल दरीच्या टोकाला झोक्यावर बसण्याचा आनंद अनेकजण घेतात. अशा झोक्यावर बसणे साहसी खेळ म्हणून पाहिले जाते त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाणी अशा झोक्यावर बसून फोटो शूट करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. गोवा, बालीसह अनेक पर्यटन स्थळी असे झोके पाहायला मिळतात. सोशल मिडियावर अशा झोक्यावर बसलेल्या पर्यटकांचे फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान अशाच एका झोक्यचा आनंद घेणाऱ्या तरुणाची चांगलीच फजीती झाली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पठ्ठ्यानं अख्खं झाड अंगावर घेतलं

झोका खेळताना कधी उंच झोका घेण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन झोक्यावरील व्यक्ती खाली पडते.  तसा झाडाला बांधलेला झोका हा सेफ असतो, तो तुटण्याची सहसा शक्यता नसते. मात्र वजनदार व्यक्ती वारंवार क्षमतेपेक्षा जास्त वजन टाकत असेल तर काय होणार हे सांगायला नको. असंच काहीसं या तरुणासोबत झालं. झोका घेण्याची हौस त्याला चांगलीच महागात पडली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक जाडजूड तरुण छोट्याशा झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोका घेत आहे. तसं पाहायला गेलं तर तो झोका या तरुणासमोर अगदीच छोटा आहे, त्यामुळे या झोक्यावर बसणं त्यानं टाळलं पाहिजे होतं. मात्र तरुण झोक्यावर बसला दोन झोके घेतले अन् पुढच्याच क्षणी अख्खं झाड अंगावर घेतलं.

VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

यामध्ये त्याला स्वत:ला थोडीफार दुखापत झालीच पण सोबत झाडंही पडलं. असं असलं तरी हा व्हिडीओ पाहून मात्र तुम्ही पोट धरुन हसाल. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की नेटकरी पोट धरून हसत आहे. झोका घेण्याच्या नादात तरुणाची जी अवस्था झाली आहे ते पाहून प्रत्येक जण हसत आहे. तुम्हीही पाहा व्हिडीओ..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> झोपलेली असताना महिलेच्या केसात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ iamchirag_mehta नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही या व्हिडीओवर देत आहेत.