Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होतात, यात कधी गाण्यांवरील रिल्स, डान्स, विनोदी व्हिडीओ आपण पाहतो. शिवाय अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील यावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ज्यामध्ये कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात, तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात. अशातच आता एका गोंडस हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

प्राणीदेखील माणसांप्रमाणेच विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात एक हत्तीचे पिल्लू एकांतात एका तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असेच एक पिल्लू खेळताना दिसत आहे.

The puppy will cry after the owner's scream
“आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
deposit slip column was Rashi in Hindi translation woman writes her Zodiac sign Libra in the amount column bank employees were shocked viral video
महिलेने बँकेत पैसे जमा करताना रकमेएवजी डिपॉझिट स्लिपवर लिहिले असे काही की… बँक कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का; पाहा VIDEO
Two cows started fighting on the road
Viral Video: भररस्त्यात दोन गायी भिडल्या पण श्वानाने केलं असं काही… पाहून नेटकरी म्हणाले,”याला एक पुरस्कार द्या…”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मातीच्या लहान खड्ड्यात पाणी भरण्यात आले आहे. या खड्ड्यात गरमीने वैतागलेले हत्तीचे पिल्लू खेळताना दिसत आहे. यावेळी ते पिल्लू सोंडेने पाणी बाहेर उडवत आहे तर अधून मधून तो पाण्यात खाली बसत आहे. हत्तीचा हा खेळ पाहून तुम्हालाही हसू येईल.

हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Wildlife SOS या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. शिवाय हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “या व्हिडीओतील हत्तीच्या पिल्लाचे नाव बनी आहे. मथुरा येथील एलिफंट हॉस्पिटल कॅम्पसमध्ये उन्हाळ्याचे तापमान वाढल्याने येथील काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यासाठी हा छोटा पूल तयार केला आहे. हा खोदलेला मातीचा तलाव दररोज ताज्या थंड पाण्याने भरलेला असतो. हा पूल बनीला उष्णतेपासून आराम देतो. शिवाय चिखलाने अंघोळ केल्याने त्याच्या त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो, ज्यामुळे त्याचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते.”

हेही वाचा: ‘का कळेना अशी हरवली पाखरे’; तब्बल २४ वर्षानंतर दहावीची बॅच पुन्हा एकत्र, VIDEO पाहून तुम्हालाही येईल शाळेची आठवण

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर आतापर्यंत जवळपास तीन हजारांहून अधिक व्ह्यूज, तर एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तर अनेक युजर्सही या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “व्वा, किती गोंडस बाळ आहे बनी”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “स्वीट बनी”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “तो खूप आनंदी दिसत आहे, बनी लव्ह यू”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “किती गोड, निरागस पिल्लू आहे.”