Wedding card viral : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. आपलं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहावं त्यासाठी लोक अनेक भन्नाट आणि हटके आयडिया शोधतात. कधी लग्नाचं ठिकाण, ड्रेस किंवा खास वेडिंग कार्ड अशा अनेक गोष्टींवर तुफान पैसा खर्च केला जातो. सध्या सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका व्हायरल होते आहे. ही पत्रिका पाहून तुम्ही म्हणाल की, काय क्रिएटिव्हटी आयडिया आहे.
अच्छा आम्हाला सांग, आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या हटके लग्न पत्रिका पाहिल्या आहेत. रुमाल, झाडाच्या पानावर लग्नपत्रिका तुम्ही पाहिली असेल. पण खरं तर ही पत्रिका इतकी अनोखी आहे की, ती पाहून काही वेळासाठी गोंधळून जाल. सध्या ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पुत्रिकेत नवरा-नवरीची नावं वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल. इतकंच काय, या नावांची लोकं खरंच जगात असतील यावर विश्वास ठेवणं देखील कठीण वाटेल. एवढंच नाहीतर नवरा-नवरीसारखेच त्यांच्या पालकांची नावं सुद्धा डेंजर आहेत.
लग्नाच्या पत्रिका पाहुण्यांना लग्नाबद्दल सर्व आवश्यक माहिती देण्यासाठी डिझाइन केलेले असते. या पत्रिकांमध्ये वधू आणि वरांची नावे, लग्नाची तारीख, वेळ आणि ठिकाण यासारखी माहिती असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका पोलिसाच्या व्हायरल लग्नपत्रिकेची. ही लग्नपत्रिका पाहून कुणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. अनेकजण या पोस्टवर भन्नाट कमेंट्सही करताना दिसत आहेत. सध्या ही लग्नपत्रिका बरीच चर्चेत आली आहे ती म्हणजे या लग्नपत्रिकेवरील मजकूरावरून. पाहुयात नक्की या लग्नपत्रिकेत असं काय लिहिलंय की नेटकऱ्यांनीही आपलं हसू आवरणं हे कठीण झालं आहे.
या लग्नपत्रिकेत नवऱ्याचं नाव आहे ‘लोटा नाथ’, तर नवरीचं नाव आहे ‘लोटकी देवी’. ही नावं त्या व्हायरल होत असलेल्या पत्रिकेत स्पष्टपणे छापलेली आहेत. पुढे नवरा नवरीच्या पालकांची नावं सुद्धा एकदम भन्नाट आहेत. नवरीच्या आईचं नाव आहे ‘मग देवी’, तर वडिलांचं नाव आहे ‘बाल्टी नाथ’. त्यांच्या पत्त्यामध्ये ‘सीवान, बिहार’ असं नमूद केलं आहे.
पाहा पत्रिका
या अनोख्या लग्नाचे कार्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर amritayd383 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आले आहे. ही लग्नपत्रिका पाहून लोक काहीजण आश्चर्यचकित झाले होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही या लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे.