'लावणी' ही महाराष्ट्राची लोककला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही कला जपण्याचा आणि पुढे नेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य सादर केले जाते असल्याचा आरोप अनेक जण करतात. त्यामुळे पारंपारिक लावणी जपावी यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. कला ही एखाद्याला जन्मत: मिळते किंवा एखाद्याला खूप मेहनत घेऊन ती मिळवावी लागते. अनेकदा परिस्थितीमुळे किंवा संधी न मिळाल्याने अनेकांची कला हरवून जाते. पण काही लोक असे असतात की आयुष्यात परिस्थिती काही असली तरी आपली कला कायम जोपासतात. सध्या अशाच एका मावशींची व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यांनी आपली लावणी करण्याची कला जोपासली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका महिलेने पारंपारिक नऊवारी(लुगड) परिधान केले आहे आणि चंद्रा या गाण्यावर सुंदर लावणी सादर करते. ही महिला गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते अशी माहिती व्हिडिओ शेअर करताना दिली आहे. मावशींची लावणी नेटकऱ्यांनी प्रचंड आवडली आहे. अनेकांनी मावशींचे वय झाले असूनही इतका उत्साहाने लावणी सादर केल्याने त्यांचे कौतूक केली. हेही वाचा - Viral Video: भरदिवसा मुंबईच्या रस्त्यावर टॉवेल गुंडाळून फिरताना दिसली मॉडेल; काय आहे Viral Videoचे सत्य? व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, "महाराष्ट्राची शान असलेली "लावणी" सादर करण्यासाठी वय, फिगर, तोकडे कपडे, अश्लील हावभाव यापैकी एकही गोष्ट लागत नाही हे पटवून देणारा हा मावशींचे नृत्य" दुसऱ्याने लिहिले की, "छंद नसलेली व्यक्ती कायम रुक्ष आयुष्य जगत असते. तर छंद जोपासणारे आयुष्याचा खरा आनंद घेत असतात. जशा या मावशी, खूप छान मावशी अश्याच आनंदी रहा. तिसरा म्हणाला, हे फक्त नृत्य नाही तर आजच्या रिल्स स्टार लोक जे आज काल पाश्चात्य संस्कृतिचा मागे आहेत त्यांच्यासाठी मावशींची लावणी म्हणजे एक टोला आहे. पूर्ण अंग भरुन नऊ वारी साडी परिधान करून अंगी असणारी कला दाखवता येते हे आज मावशीनी दाखवून दिल आहे.चौथा म्हणाला की, "खरचं सलाम आहे ह्या मावशीला ह्या वयामध्ये एवढी ऊर्जा" हेही वाचा - ‘आयुष्य म्हणजे खेळ नव्हे!’, चिमुकलीच्या डोळ्यांसमोर धबधब्यामध्ये वाहून गेली आई, Viral Video पाहून उडेल थरकाप पाचवा म्हणाला की, "प्रत्येक माणसात कलाकार लपलेला असतो. फक्त ती कला सादर करायला ती वेळ यावी लागते." आणखी एकाने लिहिले की, "या वयात आपली कला सादर केली हे वैशिष्ट्य, जबरदस्त, अप्रतिम लावणी सादर केली"