जीवन आणि मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यूचा सामना करावा लागणार आहे. पण अनेकदा आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा अनेकदा एखादा मृत्यूच्या दाढेतून परत येतात. जगण्याचा खरा संघर्ष मृत्यू जवळून पाहिल्यानंतर सुरु होतो. माणूस असो वा प्राणी सर्वांनाच जीवन-मृत्यूचा संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जंगलात हिंस्र प्राण्यांना शिकार करावी लागते कारण त्या शिवाय ते जगू शकत नाही पण इतर प्राण्यांना मात्र आपली शिकार होऊ नये म्हणून संघर्ष करावा लागतो. वन्य प्राण्यांच्या शिकारीचे अनेक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यामध्ये जीवन-मृत्यूचा खेळ सुरु असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बिबट्या एका माकडाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी माकड एका झाडावर चढते आणि झाडाच्या लोकावर जाऊन बसते. पाठोपाठ बिबट्याही झाडावर चढतो. या झाडाचे तीन खोड तीन दिशांना पसरले आहे. जसा बिबट्या एका खोडावर चढतो तसे माकड दुसऱ्या खोडाच्या फांदीच्या टोकावर उडी मारते. बिबट्या फिरून दुसऱ्या खोडावर चढला की माकड पुन्हा पहिल्या खोडाच्या फांदीवर उडी मारते. हाच प्रकार बराच वेळ चालू राहतो. माकड जीव वाचवण्यासाठी शक्कल लढवते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारून बिबट्याला चकवत राहते. माकडाला पकडण्याच्या नादात बिबट्याही एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून उड्या मारत राहते. बिबट्या माकडला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे पण माकड अत्यंत चतुराईने आणि चपळाईने बिबट्यासा चकवा देत आहे. हा क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. जीवन-मृत्यूचा खेळ दर्शवणारा हा क्षण पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहीला आहे. हेही वाचा - पुणेकरांनो, विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखताय? थांबा….आधी हा Video बघा हेही वाचा - मुसळधार पावसानंतर खचला रस्ता! भल्या मोठ्या खड्ड्यात अडकली कार, येथे पहा Viral Videoइंस्टाग्रामवर wilda.nimalpower नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढलेला बिबट्या" असे कॅप्शन व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, रात्रभर नाच राहू या भाऊ (कारण व्हिडीओ पाहिल्यावर बिबट्या आणि माकड झाडावर नाचत असल्यासारखे वाटत आहे)दुसऱ्याने लिहिले की, "बिचारा बिबट्या"तिसरा म्हणाला, "सर्वात आधी कोण थकेल?"