Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात महत्वाचा असतो तो मखर. बाप्पाचा मखर अगदी क्रिएटिव्ह असावा असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. मार्केटमध्ये तुम्हाला बरेच थर्माकॉलचे मखर दिसतील. मात्र कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका गणपती मंदिरात बाप्पाला चक्क नोटांच्या मखरामध्ये बसवलं आहे. या गणपती मंदिराला तब्बल २ कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आलं. बंगळुरुच्या पुत्तेनहल्ली परिसरातील श्री सत्य गणपती मंदिरात ही सजावट करण्यात आली. या सजावटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बाप्पाचं मखर सजवण्यासाठी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या. यामुळे मंदिराला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय २२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही २४ तास भाविकांवर राहणार आहे. सुमारे १५० स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी सजावटीसाठी काम केले आहे. अतिशय आकर्षक अशी ही बाप्पाची सजावट दिसत आहे. हीच सजावट पाहण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा Whatsapp Status व फेसबुकवर शेअर करत करू स्वागत; ‘इथे’ करा फ्री डाउनलोड

ए आई बाप्पा आले गं, असं वाक्य आता प्रत्येका घरी बोललं जाईल. सण हे आपल्यातील नातं घट्ट करण्यासाठी असतात. लोकमान्य टिळकांनी हेच ओळखून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. गणपती येण्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो. गणेशोत्सव म्हणजे नात्यांचा उत्सव.

Story img Loader