scorecardresearch

‘घरचा गणेश’ फोटो अपलोड करण्याचा आज शेवटचा दिवस; तुम्ही केला नसेल तर आजच करा!

Ganeshotsav 2023: वाचकांनो, तुम्ही शेअर केलेल्या फोटोजमधील काही निवडक फोटो हे लोकसत्ताच्या ऑनलाईन वेबसाईटवर तसेच वृत्तपत्रात सुद्धा झळकणार आहेत.

gharcha ganesh

Ganesh Chaturthi 2023: काय मग मंडळी गणेशोत्सवाची लगबग सुरू असेल ना? दिवा ताम्हणाला लख्ख करण्यापासून ते सजावट, नैवेद्य सगळी धावपळ तुमच्याकडेही सुरू असेल, हो ना? अशावेळी आज आम्ही तुमचा जास्त वेळ खर्ची न करता थेट मुद्द्याचं सांगणार आहोत. आता तुम्ही एवढी तयारी करताय म्हणजे साहजिकच फोटोशूट पण मस्त होईलच. दरवेळी फोटो काढल्यावर आपण फार फार तर Whatsapp Status, Instagram Story, FB Post यावरच शेअर करतोय. फार फार तर काय ओळखीच्या चार नातेवाईकांना पाठवतो पण यावेळी तुमच्या ‘घरचा गणेशा’ सातासमुद्रापार पोहोचवण्याची संधी आम्ही आणली आहे. तुम्ही तुमच्या घरचा गणेशाचा फोटो लोकसत्ता.कॉम वर अपलोड करू शकता ज्यामुळे लाखो वाचकांना तुमची सजावटीची भन्नाट कल्पना व सुंदर बाप्पाचे दर्शन घेता येईल. अगदी काही सेकंदात तुम्ही अपलोड प्रक्रिया पूर्ण करू शकता. कशी ते ही पाहूया..

लोकसत्ता. कॉमवर घरच्या गणेशाचा फोटो अपलोड करण्याच्या स्टेप्स –

  • loksatta.com च्या ‘होम पेज’वरील ‘घरचा गणेश’ बॅनरवर क्लिक करा.
  • आता नवीन टॅब उघडेल. येथे फोटो अपलोड करून तुमची माहिती भरा आणि ई-मेल आयडीने साइन अप करा.
  • मोबाइल कॅमेऱ्याने काढलेला फोटो थेट अपलोड करण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे.
  • फोटोची फाईल साइज ५ एमबीपेक्षा कमी असावी. फोटो JPG, JEPG व PNG फॉरमॅट मध्ये असावा.

वाचकांनो, तुम्ही शेअर केलेल्या फोटोजमधील काही निवडक फोटो हे लोकसत्ताच्या ऑनलाईन वेबसाईटवर झळकणार आहेत. तुम्हा सर्व वाचकांना लोकसत्ता ऑनलाइनच्या कुटुंबाकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या बाप्पाचे फोटो पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2023 share you gharcha ganesha on loksatta amazing ganpati decoration puja aarti vidhi photos upload svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×