Mumbai Goa Highway Traffic live status: अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांचा सामना करत मुंबईकर कोकणात दाखल व्हायला सुरवात झाली आहे. पण, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहानांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी चालू असून मुंबई, पुण्यामध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचीही गावी जाण्याची गडबड सुरू आहे. नोकरी, तसेच व्यवसायानिमित्त मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमानी गावाकडे निघाल्याने बसस्थानके, रेल्वेस्टेशन गर्दीने फुलून गेले असून दोन दिवसांपासून मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. याच गर्दीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा मुहूर्त गाठत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणाच्या दिशेनं रवाना झाले आहे. मुंबई गोवा महामार्गासमवेत पर्यायी रस्त्यांवरही सध्या मोठ्या संख्येनं वाहनांची वर्दळ सुरू असून, त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि गुरुवारी रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचेही हाल होत असून ट्रॅफिक सुरळित करताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार आता माणगावमध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. लोक अक्षरश: गाडीमधून उतरुन बाहेर आले आहेत. रस्त्यात असलेले खड्डे, रस्त्याची सुरू असलेली कामं यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रागा सध्या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गावी पोहोचण्यास चाकरमान्यांना उशिर होत आहे पाहा व्हिडीओ हेही वाचा >> लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर सोशल मीडियावर हा व्हिडीओ swargahun_sundar_aamch_kokan नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन २० तासांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून, "एका रात्रीत अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद फक्त कोकणी माणसातचं आहे" "जायची किती ती हौस" "देव बोलावतोय आमचा" अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकरी देत आहेत.