Ganpati Visarjan Police Dance Video : गणेशोत्सवादरम्यान देशभरात भक्ती आणि उत्साहाचे एक वेगळेच वातावरण पाहायला मिळते. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत नागरिक नाचत-गावत बाप्पाला निरोप देताना दिसले. गणेशोत्सवादरम्यानचे अनेक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. असाच एक व्हिडिओ सध्या तेलंगणातून समोर आला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
खाकी वर्दीत पोलिसांनी धरला ठेका
या व्हिडिओमध्ये काही पोलीस कर्मचारी गणेश विसर्जन मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षा सांभाळताना दिसत आहेत. मात्र, आजूबाजूचे भक्तीमय वातावरण आणि ढोल-ताशांचा आवाज ऐकून पोलिसही स्वतःला नाचण्यापासून रोखू शकले नाहीत. अंगावर खाकी वर्दी असतानाही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचताना दिसले.
ढोल-ताशांचा आवाज ऐकताच पोलिसांचा उत्साह शिगेला
व्हायरल व्हिडिओमध्ये ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पाच्या जयघोषादरम्यान पोलिसांचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे. काही पोलीस कर्मचारी रस्त्यावरील नागरिकांबरोबर आनंदात नाचताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या भक्तीचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. एकापेक्षा एक जबरदस्त स्टेप्स नाचताना दिसल्या,
गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असतो. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत चालवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही पोलिसांची मुख्य जबाबदारी असते. ही कडक ड्युटी बजावत असतानाच बाप्पाचा जयघोष ऐकून हे पोलीस अधिकारीही उत्सवाच्या रंगात रंगून गेले. पोलिसांचा हा मनमोकळा अंदाज आणि भक्ती पाहून सर्वसामान्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
