Ganeshostav 2024 Viral video: मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शनिवारी सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी तेथे गणपतीचं दर्शन मिळण्याचं सोडून गर्दीचा पूर, भाविकांचा बेशिस्त, तसेच कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक यांच्यामध्ये होणारा वाद ही काही नवी गोष्ट नाही. हे कार्यकर्ते भाविकांना शिस्त शिकवत असतात; मात्र दुसरीकडे ओळखीच्या लोकांना ‘वेगळा न्याय’ दिला जातो. अशा प्रकारच्या घटना प्रत्येक मंडळामध्ये पाहायला मिळतात. कार्यकर्ते हे सगळं आपल्याच हातात असल्यासारखं बेदरकारपणे वागत असतात. अशा वेळी बऱ्याचदा भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात, धक्काबुक्की होते

दरम्यान, सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचाही संताप होईल. कारण- एका कार्यकर्त्यानं बाप्पाचं दर्शन घेणाऱ्या एका गरिबाला थेट लाथेनं उडवलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही खूप संतापले आहेत.

joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
jahnavi killekar wash mother in law feet and perform pooja
Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…”
Kunal Kamra response to CEO Bhavish Aggarwal Diwali celebration video
‘सर्व्हिस सेंटरचा फुटेज दाखवा…’ ओला कंपनीच्या दिवाळी सेलिब्रेशन VIDEO वर कॉमेडियन कुणालची कमेंट; CEO वर साधला निशाणा
navra maza navsacha 2
Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO

‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव’, ‘देव अशानं पावायचा नाही रं’, अशा पंक्तींची आठवण येण्याची वेळ या कार्यकर्त्यानं आणली आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीशेजारी उभं राहून असं कोणी कसं वागू शकतं?, हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून जाणाऱ्या एका गाडीवर बाप्पाची मूर्ती आहे आणि बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे. यावेळी कार्यकर्ते बाप्पाच्या मूर्तीजवळ उभे आहेत. बाप्पाची एखादी मिरवणूक जेव्हा निघते तेव्हा येणारा-जाणारा प्रत्येक भाविक आपसूकच बाप्पाच्या पाया पडतो वा नतमस्तक होतो. अशीच कृती या गरिबानंही केलं, त्यानं बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पायाला हात लावताच मूर्तीशेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यानं त्याला थेट लाथेनं उडवलं. अशा प्रकारचं माणुसकीला काळिमा फासणारं वर्तन पाहून सगळेच संतापले आहेत. हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच सांगा चूक नक्की कुणाची.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?

“मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ biden_nanaनावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका”, अशी कॅप्शन लिहिली आहे. नेटकऱ्यांनीही त्या रानटी माणसावर टीका केली आहे. एकानं कमेंट केलीय, “देवाच्या दरबारात लहान-मोठा कोणीही नसतो. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद घेण्याचा सर्वांना हक्क आहे.” तर, दुसरा म्हणतो, “कार्यकर्त्यानं हे खूप चुकीचं केलं.”