Ganeshostav 2024 Viral video: मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शनिवारी सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी तेथे गणपतीचं दर्शन मिळण्याचं सोडून गर्दीचा पूर, भाविकांचा बेशिस्त, तसेच कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक यांच्यामध्ये होणारा वाद ही काही नवी गोष्ट नाही. हे कार्यकर्ते भाविकांना शिस्त शिकवत असतात; मात्र दुसरीकडे ओळखीच्या लोकांना ‘वेगळा न्याय’ दिला जातो. अशा प्रकारच्या घटना प्रत्येक मंडळामध्ये पाहायला मिळतात. कार्यकर्ते हे सगळं आपल्याच हातात असल्यासारखं बेदरकारपणे वागत असतात. अशा वेळी बऱ्याचदा भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात, धक्काबुक्की होते
“मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका” कार्यकर्त्यानं रस्त्यावरच्या गरिबाला थेट लाथेनं उडवलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची
Shocking video: एका कार्यकर्त्यानं बाप्पाचं दर्शन घेणाऱ्या एका गरिबाला थेट लाथेनं उडवलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-09-2024 at 13:45 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshostav 2024 shocking video man directly kicked the poor man on the street while he falling at the feet of lord ganesha srk