Premium

इरशाळवाडी पीडितांना गणपतीच्या देखाव्याद्वारे वाहण्यात आली भावनिक श्रद्धांजली; पाहा Video

इरशाळवाडी दरड दुर्घटनेवर आधारित हा देखावा आता सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Ganeshotsav 2023 ganesha devotee pays emotional tribute to irshalwadi landslide victims through appearance in front of lord ganesha decoration
इरशाळवाडी पीडितांना गणपतीच्या देखाव्याद्वारे वाहण्यात आली भावनिक श्रद्धांजली; पाहा Video (photo – a___s____h___u_ instagram)

गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर त्याच्या भोवतीची सजावट आणि खास देखाव्यांची विशेष चर्चा रंगते. यात अनेक घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खास देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. पण जिवंत देखाव्यांची परंपरा आजही अनेक लोक जपत आहेत. अशाप्रकारे एका घरगुती गणपती देखाव्याद्वारे रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीतील दरड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गावकऱ्यांना भावनिक श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या देखाव्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी गावावर १९ जुलैच्या मध्यरात्री दरड कोसळली, ज्यात शेकडो संसार उदध्वस्त झाले. सतत होणाऱ्या मुसळधार पावसात अचानक दरड कोसळली आणि त्याखाली संपूर्ण गाव गाडलं गेलं. यात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आणि अनेकांचे आयुष्य एका क्षणात बदलले. या घटनेने व्यथित झालेल्या एका व्यक्तीने यंदा गणेशोत्सवात पीडितांना श्रद्धांजली देण्यासाठी गणपती बाप्पाच्या भोवती खास इरशाळवाडी गावाचा देखावा तयार केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganeshotsav 2023 ganesha devotee pays emotional tribute to irshalwadi landslide victims through appearance in front of lord ganesha decoration sjr

First published on: 25-09-2023 at 18:34 IST
Next Story
‘हीच खरी श्रीमंती!’ Video पाहून गावाकडच्या आठवणींना मिळेल उजाळा…