कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही असं म्हणतात, सध्या अशीच एक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीचं नशीब काही क्षणात पालटलं आहे आणि त्यासाठी कारण ठरला आहे कचरा. हो कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं. पण खरोखर कचऱ्यामुळे एक व्यक्ती रातोरात करोडपती बनला आहे. कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी रुपये किमतीची डिझायनर वस्तू सापडल्याने त्याचे नशीब अचानक पालटलं आहे. जेव्हा त्या व्यक्तीला त्याला कचऱ्यात सापडलेल्या वस्तूंची किंमत कळली तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला.

कचऱ्यात सापडलेल्या वस्तूंमुळे करोडपती बनलेल्या व्यक्तीने सांगितलं की, “याआधीही डस्टबिनमधून त्याला अनेक महागड्या वस्तू सापडल्या आहेत” मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्याच्या केंटमध्ये राहणारा ४७ वर्षीय मार्टिन नावाचा व्यक्ती लहानपणापासूनच डस्टबिनमधून वस्तू गोळा करायचा. कालांतराने त्यांनी कचरा गोळा करण्याचा व्यवसाय सुरु केला.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

हेही वाचा- वरातीसाठी कायपण! खर्च करायला पैसे नाहीत म्हणून लग्नाआधीच नवरदेव थेट ATM फोडायला गेला अन्…

नुकतेच मार्टिनला डस्टबिनमधून नायके कंपनीचे शूज आणि आयफोनसह अनेक ब्रँडेड वस्तू सापडल्याने ज्या पाहून तो आश्चर्यचकित झाला. याशिवाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्यांना सौंदर्य उत्पादनेही मिळाली आहेत. ज्या सर्व वस्तूंची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.

‘द सन’शी बोलताना मार्टिनने सांगितले की, तो दर आठवड्याला २० हजार ते १ लाख रुपये कमावतो. मार्टिनच्या म्हणण्यानुसार , त्याला कचऱ्यात फक्त अशाच गोष्टी सापडतात ज्या सहज रिसायकल केल्या जातात, ज्यामध्ये पुठ्ठा आणि प्लास्टिकचा समावेश असतो. मार्टिनने यांनी सांगितलं की, काही महिन्यांपूर्वीच त्यांना लाखो रुपयांची नेलपॉलिश मिळाली होती.

हेही वाचा- विंडो सीटसाठी पैसे दिले अन् विमानात गेला तर खिडकी गायब; ‘या’ प्रवाशासोबत घडलेला किस्सा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

मिळालेल्या वस्तू करतो दान –

शिवाय एका गरीब कुटुंबात जन्म झाला ज्यामुळे मी लहानपणापासून डस्टबिनमध्ये जे काही मिळेल ते विकायचो आणि मिळालेल्या पैशातून कुटुंबाला हातभार लावायचो असंही त्यांनी सांगितलं. मार्टिन यांनी डस्टबिनमधून सापडलेल्या अनेक वस्तू दानही केल्याचं त्यांनी सांगितलं. “ज्या लोकांना एखाद्या वस्तूंची जास्त गरज आहे आणि ती मला कचऱ्यात सापडली तर मी गरजू लोकांना दान करतो.”