Gas Stove Explosion Video: काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आधी चुलीवर होणारा स्वयंपाक आता गॅसवर होऊ लागलाय. त्यामध्येही आधी लोक स्टीलच्या शेगड्या वापरायचे; पण आता ग्लास कोटिंगच्या शेगड्या घराघरात पाहायला मिळतात. ग्लास शेगडीचा वापर किंवा ग्लास शेगडीची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. पण, ही शेगडी वापरताना थोडी काळजी घ्या; अन्यथा असं काहीतरी घडू शकतं. एक तरुण किचनमध्ये बटर पनीर बनवत होता. पण, तेवढ्यात शेगडीचा स्फोट झाला. आणि पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. जर तुम्हीदेखील आपल्या घरी काचेची शेगडी वापरत असाल, तर सावध व्हा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

तुम्हीही ग्लास शेगडी वापरता का?

Which finger should you get a glucometer test done on?
तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
St driver wrote on bus bonnet | St bus Viral Video | MSRTC bus
एसटी बसचालकाने बोनेटवर लिहिले असे काही की… तुम्ही चुकूनही त्यावर पाय ठेवणार नाही, Video एकदा पाहाच
Nagpur Video | ganeshotsav 2024
Nagpur Video : याला म्हणतात नाद! ढोल ताशा नव्हे तर खोक्यावर धरला ठेका; निरागस चिमुकल्याचा जोश पाहून व्हाल अवाक्
Lion Fights With 20 Hyenas And 15 Vultures An Animal Video
झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला आता है; १५ सेंकदात दाखवून दिलं स्वत:चं अस्तित्व; VIDEO पाहून झोप उडेल
move your chats photos from Android to iPhone
Android वरून iPhone वर चॅट्स, फोटो कसे ट्रान्सफर करायचे? फक्त या सोप्या स्टेप्स फॉलो करा
Kitchen jugaad video marathi toothpaste on paneer use for skin cleaning
Kitchen Jugaad: महिलांनो पनीर वापरताना एकदा त्यात टुथपेस्ट नक्की टाका; विचित्र आहे पण होईल मोठा फायदा
Why Blue tiles used in swimming pool scientific and psychiatric reason
स्विमिंग पूलमध्ये निळ्याच टाइल्सचा का होतो वापर? तुम्हाला कधी पडलाय का प्रश्न? मग जाणून घ्या यामागचं खरं कारण

स्वयंपाकघरात सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गॅस शेगडी, ज्याशिवाय जेवण तयार करणे अवघड आहे. भलेही आज स्वंयपाकघरात इंडक्शन किंवा मायक्रोवेव्हचा वापर होत असला तरीही काही गोष्टींसाठी गॅस शेगडीवरच अवलंबून राहावे लागते. गॅस शेगडी वापरण्याची एक वेगळी पद्धत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने गॅस शेगडी वापरताना काय काळजी घ्यावी याकडे लक्ष दिले पाहिजे.

काय घडलं पाहा

गॅसच्या स्फोटात जीवित, तसेच वित्तहानी होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यासाठी वरचेवर गॅस शेगडीची तपासणी केली जाणं गरजेचं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण किचनमध्ये बटर पनीर बनवत होता; पण तेवढ्यात गॅसमध्ये काहीतरी गडबड झाली आणि एक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, शेगडीची काच फुटली आणि काचेचे तुकडे संपूर्ण घरात पसरल्याचे दिसत आहे. सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. पण, जर का एखादा तुकडा डोळ्यांत वगैरे गेला असता, तर आणखी मोठं नुकसान झालं असतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Satara News: ‘सेल्फी’ काढताना तरुणी २५० फूट दरीत कोसळली; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, रेस्क्यूचा थरारक VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर jyothi_naidu715 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. नेहमी गॅस वापरणारे आपण त्याबाबत पुरेसे जागरूक असतोच, असे नाही. मात्र, कधीतरी गॅसबाबत काही झाले, तर आपण तो दुरुस्त करण्यासाठी, त्यासंबंधीच्या जाणकार व्यक्तीला बोलावतो. परंतु, खरं तर गॅस हा वर्षातून किंवा दोन वर्षांतून एकदा तरी तपासून घ्यायला हवा. कारण- तो कुठे लिकेज होत नाही ना हे ठरावीक दिवसांनी तपासणे आवश्यक आहे; अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो.