Protein Condom Viral Post: आरोग्य निरोगी आणि आजारमुक्त ठेवण्यासाठी विविध दावा करणाऱ्या वेगवेगळ्या सप्लीमेंट बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या प्रकारच्या हजारो प्रोडक्टचे मार्केटींग सध्याच्या डिजिटल युगात पाहायला मिळत आहे. जिमला जाणाऱ्यांसाठी प्रोटीन पावडर, बार आणि शेक या गोष्टी काय नवीन नाहीत. पण, बाजारात आता ‘प्रोटीन कंडोम’ उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. जगातील हा पहिलाच अशा प्रकारचा कंडोम असल्याचा दावा केला जातोय. या प्रोडक्टमुळे इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.
बीस्ट लाईफ ब्रँडचा प्रोडक्ट?
गौरव तनेजाच्या ‘बीस्ट लाईफ’ ब्रँडने ‘प्रोटीन कंडोम’ बाजारात आणला आहे. बीस्ट लाईफचे अनेक सप्लीमेंट बाजारात उपलब्ध आहेत. पण, प्रोटीन कंडोममुळे इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. इन्स्टाग्रामवरुन याबाबत एक पोस्ट करण्यात आली असून, यात परफॉर्मन्सबाबत उल्लेख करण्यात आला आहे. अनेकांनी एप्रिल फुलच्या निमित्ताने केलेला हा मोठा विनोद असल्याचा दावा केला तर, अनेकांनी या दाव्यात काही तथ्य आहे का? याबाबत सवाल उपस्थित केले.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
प्रोटीन कंडोमचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अनेकांनी प्रोटीन कंडोमची पोस्ट केली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अनेक नेटकऱ्यांनी या प्रोडक्टबाबत विनोद करताना मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कोणी मागणी न करता लावण्यात आलेला शोध”, अशी एक प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली आहे. दुसऱ्या एक युझरने “संधी साधून योग्य वेळेत केलेला हे एप्रिल फुल आहे”, असे म्हटले आहे.
काही जणांनी कंपनी एप्रिल फुल ट्रेंड आणि प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हटले आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे, असे काही जणांनी म्हटले आहे.
दावा खरा की खोटा?
‘प्रोटीन कंडोम’ बाजारात येणार की नाही याबाबत स्पष्टता अद्याप नाही. तसेच, इतर कोणत्याही कंपनीने अशाप्रकारच्या प्रोडक्टचा दावा केलेला नाही. दरम्यान, बीस्ट लाईफच्या या पोस्टमुळे इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. बीस्ट लाईफ कंपनी देखील यामुळे चर्चेत आली आहे.
