Cute Girl Dance On Hill Pori Hila Video Viral : सध्या सोशल मीडिया रील स्टार्स आणि वेगवेगळ्या ट्रेंड्सनी गाजताना दिसतोय. पण सध्या एका अशा गाण्यानं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, ज्यानं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलंय. अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) आणि डान्स क्वीन गौतमी पाटील (Gautami Patil) यांचं नुकतंच रिलीज झालेलं ‘हिल पोरी हिला’ (Hill Pori Hila) हे गाणं सध्या तुफान ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यावर हजारो रील्स बनत असतानाचं एका चिमुकलीचा असा काही व्हिडीओ समोर आलाय, ज्यानं थेट गौतमी पाटीलचंही लक्ष वेधून घेतलं गेलं आहे.
चिमुकलीनं क्युटनेस अन् डान्सनं वेधलं सर्वांच लक्ष
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका लहानग्या चिमुकलीनं आपल्या क्युटनेस आणि डान्सनं सोशल मीडिया युजर्सना वेड लावलंय. तिनं केवळ डान्सच केला नाही, तर ती चक्क स्वतः हे गाणं अगदी सुरात गाताना दिसतेय.
चिमुकलीनं सुंदर गुलाबी रंगाची साडी, हातात हिरवा चुडा, नाकात नथ आणि गळ्यात, कानात पारंपरिक दागिने, असा अस्सल मराठमोळा साज केला आहे. गाण्याच्या प्रत्येक बीटवर तिचे एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स इतक्या अचूक आहेत की, पाहणारा प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडतोय.
या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, तो थेट या गाण्याची मुख्य अभिनेत्री गौतमी पाटीलपर्यंत पोहोचला. गौतमीनं या लहान मुलीचा डान्स पाहून तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. गौतमीनं हा व्हिडीओ पाहताच ती प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. त्यामुळे या चिमुकलीची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.
हा व्हिडीओ aarushi_gholap नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. काहींनी या चिमुकलीला ‘क्यूट’ म्हटलं आहे; तर काहींनी मजेशीर कमेंट करीत लिहिलंय, “या चिमुकलीनं तर भाऊ कदम आणि गौतमी पाटील दोघांनाही टफ कॉम्पिटिशन दिलीय!”, एकानं लिहिलं की, गाण्याच्या एवढ्या लिरिक्स माझ्यापण पाठ नाहीत.
