scorecardresearch

गौतमी पाटील नऊवारीत नाही तर सहावारी साडीत थिरकली! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

सध्या गौतमीचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या डान्स व्हिडीओमध्ये गौतमी सहावारी साडी नेसली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे.

Gautami Patil Dance
गौतमी पाटील नऊवारीत नाही तर सहावारी साडीत थिरकली! (Photo : ashok_kharat4611/ Instagram)

Gautami patil : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या गौतमी पाटीलचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सहसा डान्स करताना गौतमी ही नऊवारी नेसते पण तुम्ही कधी गौतमीला साडी नेसून डान्स करताना पाहिले आहे का? सध्या गौतमीचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या डान्स व्हिडीओमध्ये गौतमी सहावारी साडी नेसली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गौतमीने पिवळ्या रंगाची सहावारी साडी नेसली आहे. ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे आणि स्टेजसमोर असलेले हजारो प्रेक्षक तिचा डान्स बघताना दिसत आहे. काही लोकं तिचा डान्स मोबाईलच्या कॅमेरात शुट करत आहे. गौतमी पिवळ्या सहावारी साडीत खूप सुंदर दिसत आहे. गौतमी नेहमी नऊवारी नेसून डान्स करते पण तिला असे सहावारीत सुंदर डान्स करताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

a father and daughter enjoying company
बापलेकीचं नातं जगावेगळं असतं! वडिलांबरोबर चिमुकली करतेय तुफान मस्ती, VIDEO एकदा पाहाच
Woman Belly Dance Video viral
Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये थिरकली महिला, बेली डान्सचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
Ms Dhoni Bike Riding Video Viral
महेंद्रसिंग धोनीनं जबरा फॅनला दुचाकीवर दिली लिफ्ट, व्हायरल व्हिडीओनं जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं
Mumbai local train Video group of people sing a bhajan song and keep tradition video goes viral on social media
Mumbai Video : मुंबई लोकलमध्ये जपताहेत भजनाची परंपरा, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

हेही वाचा : Mumbai Vadapav : मुंबईचा चीज वडापाव खाल्ला का? व्हायरल व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटेल

ashok_kharat4611 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून अशोक खरात हे गौतमी पाटीलचे मॅनेजर आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या या अकाउंटवरुन गौतमी पाटीलच्या डान्सचे अनेक व्हिडीओ आणि गौतमीबरोबर त्यांचे अनेक फोटो शेअर केलेले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautami patil dance in sahavari saree video goes viral on instagram social media ndj

First published on: 04-10-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×