Gautami Patil video viral: लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. गौतमीच्या कार्यक्रमांनाही चाहते प्रचंड गर्दी करताना दिसतात. गौतमी तिच्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकून घेते. गौतमी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक ट्रेंडिंग गाण्यावरही ती रील व्हिडीओ बनवते. आता गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.महाराष्ट्रातील तरुणाईला आपल्या अनोख्या अदा, ठसकेबाज सादरीकरण आणि हटके डान्स स्टेप्सने भुरळ घालणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक नवीन डान्स व्हिडीओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे.
गौतमी पाटीलने अलीकडेच ‘वेड लावलं वेड लावलं तुझ्या रुपानं वेड लावलं’ या गाण्यावर जोरदार ठेका धरला. या गाण्यावर सादर केलेल्या तिच्या खास स्टेप्स आणि आत्मविश्वासपूर्ण हावभावांमुळे हा व्हिडीओ काही तासांतच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये पोहोचला. तिच्या परफॉर्मन्समधील ऊर्जा, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स आणि स्टेजवरील कमालीची पकड यामुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने लिहिले, ‘शून्यातून वर आलेली कंपनी, हीच बघून सगळ्या शिकल्या आहेत. पहिली पसंती गौतमी पाटील!’ अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी तो शेअरही केला आहे.
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावची रहिवासी आहे. तिचं बालपण कठीण परिस्थितीत गेलंय. वडिलांनी आई आणि तिला लहानपणीच सोडलं, आणि आईच्या अपघातानंतर घराची जबाबदारी तिच्यावर आली. आर्थिक अडचणींमुळे तिने शिक्षण अर्धवट सोडून नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. अकलूज लावणी महोत्सवात बॅकडान्सर म्हणून तिचा पहिला कार्यक्रम होता, ज्यासाठी तिला 500 रुपये मानधन मिळालं. त्यानंतर तिने पुण्यातील महेंद्र बनसोडे यांच्या लावणी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. गौतमीने अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला असून, तिच्या नृत्यशैलीमुळे ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. आज ती दरमहा 22 ते 25 कार्यक्रम करते आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी सुमारे 2 लाख रुपये मानधन मिळवते.
