scorecardresearch

Premium

Gautami Patil: पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Gautami Patil Photo : जाळ आणि धूर संगटच, लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील जेव्हा थापते चुलीवर भाकऱ्या, पाहा फोटो

gautami patil latest photos instagram new post letest photo of gautami patil comments on lavani dance photo
गौतमी पाटील थापतेय चुलीवर भाकऱ्या (PHOTO: official_gautami941__Instagram)

Gautami patil news photo viral: ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.गौतमी पाटील ही लावणीसम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून देखील गौतमीने स्वतःची ओळख तयार केली आहे.

दरम्यान आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे.

pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO
A newly married couple in Pune kothrud took the blessings of Chhatrapati Shivaji Maharaj before starting their new life
पुण्यातील एका नवविवाहित जोडप्याने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, VIDEO व्हायरल
model wearing caged rat high heel on street
फॅशन म्हणून चक्क पायात घातला उंदराचा पिंजरा! पाहा हा Video पाहून तुम्ही चक्रावून जाल
nitish kumar tejashwi yadav
“फालतू बाता मारतायत, ते बच्चे होते तेव्हा…”, नितीश कुमारांचा तेजस्वी यादवांना टोला

गौतमीला नेहमी स्टेजवर धुमाकुळ घैलताना आपण पाहिलं आहे मात्र सध्या ती चक्क चुलीवर भाकऱ्या करतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, गौतमी चुलीवर भाकऱ्या थापत आहे, बाजुला पारंपारिक पद्धतीची चूल मांडली आहे, त्यावर तवा आहे, चुलीला जाळ घातला आहे, आणि गौतमी भाकऱ्या करते आहे. गौतमी पाटीलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गौतमी पाटील सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील जेव्हा थापते चुलीवर भाकऱ्या पाहा फोटो

हेही वाचा >> महिलेच्या केसांना कर्ल करण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड, गॅस लायटरचा ‘असा’ केला वापर, Video पाहून थक्क व्हाल

“जाळ आणि धूर संगटच, गौतमीची दुसरी बाजू, सर्वगुण संपन्न गौतमी” अशा अनेक कमेंट्स नेटकरी गौतमीच्या फोटोवर करत आहेत. काही महिन्यांपू्र्वी नृत्य करताना तिने अश्लील हावभाव केल्यानंतर तिच्यावर चांगलीच टीका झाली होती.त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगितलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautami patil latest photos instagram new post letest photo of gautami patil comments on lavani dance photo srk

First published on: 17-09-2023 at 09:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×