Gautami Patil Lavani Man Dies in show Viral Video Who is Gautami Patil Real Name Age Boyfriend | Loksatta

गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा

Gautami Patil Lavani Viral Video: गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा
Gautami Patil Lavani Man Dies in show Viral Video Who is Gautami Patil Real Name Age Boyfriend (फोटो: इंस्टाग्राम)

Gautami Patil Lavani Viral Video: लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव चर्चेत आले आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद पुढे खूपच चिघळला गेला. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ते बिग बॉस फेम लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली होती. आता याच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

मिरज तालुक्यातील बेडग येथे गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, इथे गौतमीला बघण्यासाठी तोबा गर्दी उसळून आली होती. आजूबाजूंच्या घरांच्या, शाळेच्या छतावर, झाडावर बसून माणसं गौतमीचा डान्स बघत होती. याच कार्यक्रमात एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. गर्दीत चेंगराचेंगरीमध्येच या माणसाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे मिरज ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान ही गौतमी पाटील नेमकी आहे कोण व अचानक तिच्या नावाचा एवढा बोलबाला का झाला आहे हे जाणून घेऊयात…

गौतमी पाटील हि मूळची धुळ्याची आहे. न्यूज १८ लोकमतच्या वृत्तानुसार, गौतमी २६ वर्षाची आहे. तिचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. गौतमी सांगते की तिने लावणीचं किंवा नृत्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेले नाही. इतर कलाकारांना बघून आपण लावणी शिकल्याचे गौतमी सांगते, मागील १० वर्षांपासून गौतमी या क्षेत्रात कार्यरत आहे.

गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ

गौतमी पाटीलच्या लावणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिच्या अंगप्रदर्शन करणाऱ्या साडीवरून अनेक लावणी कलाकार संतापल्या होत्या.

Gautami Patil Dance Video: लावणीच्या नावावर अश्लील चाळे; गौतमी पाटीलला पाहून भडकले नेटकरी अन मग..

लावणीची परंपरा धुळीत मिळवण्याचे काम या व्हायरल होणाऱ्या मुली करत आहेत असा सुर नेटकऱ्यांनीही धरला होता. खरंतर या एकूण प्रकरणानंतर गौतमी पाटीलने व्हिडीओ बनवून रीतसर माफी मागितली होती पण तिच्या या माफीनंतरही अजूनही तिचे अनेक अश्लील नृत्याचे व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2022 at 11:17 IST
Next Story
Video: भररस्त्यात सुरु होती ‘कॅट फाईट’, इतक्यात एक पाहुणा आला अन त्या दोघींनी…