Gautami Patil Latest Lavani Video Gautami Sits In Police After Huge Fight At Khandoba Yatra Viral Clip | Loksatta

Video: गौतमी पाटीलच्या ‘त्या’ लावणीमुळे पुन्हा झाला राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..

Gautami Patil Lavani Viral Video: गौतमीची लावणी सुरु झाली आणि गर्दीला असा जोश चढला की त्यामुळे पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली अन्..

Video: गौतमी पाटीलच्या ‘त्या’ लावणीमुळे पुन्हा झाला राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..
Video: गौतमी पाटीलच्या 'त्या' लावणीमुळे पुन्हा झाला राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्.. (फोटो : इंस्टाग्राम)

Gautami Patil Lavani Viral Video: लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव चर्चेत आले आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद पुढे खूपच चिघळला गेला. अलीकडेच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. आता यापाठोपाठ खंडोबा यात्रेदरम्यान पुन्हा एकदा गौतमीच्या लावणीच्या वेळी धुडगूस पाहायला मिळाला आहे.

तुळजापूर तालुक्यातल्या वडगाव इथे खंडोबा यात्रेमध्ये गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम होता. नेहमीप्रमाणे गौतमीच्या हजारो चाहत्यांनी इथे तुफान गर्दी केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, गौतमीची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण झाडावर चढून बसले होते. गौतमीची लावणी सुरु झाली आणि गर्दीला असा जोश चढला की त्यामुळे पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली. गर्दीला थांबवण्यासाठी तिथे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

गौतमी पाटील व्हायरल लावणी

दरम्यान या गर्दीतून बाहेर पडताना गौतमीच्याही नाकी नऊ आले. गौतमीला बाहेर काढण्यासाठी तिला पोलिसांनी चक्क गाडीत बसायला सांगितले आणि मग त्या चाहत्यांमधून तिची सुटका झाली.

गौतमी पाटीलने यापूर्वी आपल्या खाजगी आयुष्याविषयीही काही खास खुलासे केले होते. गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. अर्ध्यावरच शिक्षण सोडून तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. अवघ्या ५०० रुपयांच्या मानधनावर सुरु झालेला गौतमीचा प्रवास आज लाखो रुपयांचा व्यवसाय ठरला आहे.

हे ही वाचा<< गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा

गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ

हे ही वाचा<< गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क 

गौतमी पाटील ही कितीही हिट असली तरी त्याचे कारण तिचा उत्तम डान्स नव्हे अश्लील स्टेप व अंगविक्षेप आहेत असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. गौतमी तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते ज्यावर लाखो व्ह्यूज असूनही तितक्याच वाईट कमेंट असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 10:10 IST
Next Story
चक्क माशांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त, गावात कोणी पोरगी द्यायला धजेना त्यामुळे अविवाहित त्रस्त