Premium

गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहितेय का? पुण्यातून पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा, “तुला उलटं पालटं…”

Gautami Patil Controversy: गौतमी पाटील या नाऱ्याने प्रसिद्ध झालेल्या गौतमीचे आडनाव मुळात पाटील नाहीच अशी चर्चा करण्यासाठी पुण्यात अलीकडेच चक्क एक बैठक सुद्धा पार पडली होती.

Gautami Patil Real Surname Pune Maratha Officials give Warning New Controversy After Gautami Patil Clothes Changing Viral Video
गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहितेय का? पुण्यातून पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा, "तुला उलटं पालटं…" (फोटो: gautami patil/instagram)

Gautami Patil Real Surname: गौतमी पाटीलच्या अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटील उदयनराजेंची भेट, एका मागोमाग एक घडणाऱ्या या घटना व त्या नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी सदैव चर्चेत राहिली. गौतमीच्या बॉयफ्रेंडचे नाव ते तिच्या मानधनाचा आकडा प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या लग्नाच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. आता याच गौतमीचे नाव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे आणि ते म्हणजे गौतमीचे आडनाव! ज्या सबसे कातील गौतमी पाटील या नाऱ्याने प्रसिद्ध झालेल्या गौतमीचे आडनाव मुळात पाटील नाहीच अशी चर्चा करण्यासाठी पुण्यात अलीकडेच चक्क एक बैठक सुद्धा पार पडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील व काही अन्य पदाधिकाऱ्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पाटील आडनाव लावण्याबाबत थेट इशारा दिला आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच पुणे जिल्ह्यातील कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुण- तरुणींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

हे ही वाचा<< गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर

गौतमीने स्वतःविषयी केलेला खुलासा

गौतमीने आजवर अनेकदा माध्यमांसमोर आपल्या खाजगी आयुष्यावरील काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गौतमीने तिची जन्मगाव मूळ धुळे सिंदखेडा येथील असून वय २५ असल्याचे सांगितले होते. तसेच मानधनाच्या चर्चांवर तिने थेट उत्तर दिले नसली तरी ज्याप्रमाणे २ ते ३ लाख रुपये शोचे मानधन सांगितले जाते हे चुकीचे आहे असे मात्र तिने स्पष्ट केले आहे. लग्नाविषयी सुद्धा अद्याप काहीही ठरवलेले नाही ठरतात सर्वांना आमंत्रण देईन असे तिने सांगितले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautami patil real surname pune maratha officials give warning new controversy after gautami patil clothes changing viral video svs

First published on: 25-05-2023 at 16:34 IST
Next Story
तंत्रज्ञानाचा वापर असाही! चॅटजीपीचा वापर करुन प्रसिद्ध लेखकाने लिहिली तब्बल १०० पुस्तकं; एका वर्षामध्ये कमावले ‘इतके’ पैसे