scorecardresearch

Premium

गौतमी पाटीलने स्पष्ट सांगितला ‘फ्युचर प्लॅन’! म्हणाली, “आज मला फसवून जे…”, Video वर फॅन्स म्हणाले, “तू सोसलंय…”

Gautami Patil Viral Video: गौतमीचा लग्नाचा प्लॅन तर सध्या नाही हे स्पष्ट झाले होते. पण आता नव्याने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून गौतमीने स्वतःच आपला फ्युचर प्लॅन सांगितला आहे.

Gautami Patil Says I was Cheated Gets Emotional Future Plan People Say Do Not Teach Vulgar Dance After Viral Video
गौतमी पाटीलने स्पष्ट सांगितला 'फ्युचर प्लॅन'! म्हणाली, "आज मला फसवून जे … (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gautami Patil Emotional Video: गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण जितकं तगडं आहे तितकाच गौतमीचा फॅन बेस सुद्धा मजबूत आहे. फक्त तरुणच नव्हे तर महिला, लहान मुले, वयस्कर मंडळी सगळ्यांच्या मनात गौतमीचं क्रेज आहे. अलीकडेच अनेक वृत्तांमधून गौतमीच्या लग्नाबाबतच्या फ्युचर प्लॅनची चर्चा होती. गौतमी पाटील लग्न करणार? कसा नवरा निवडणार? कोणाला आमंत्रण देणार? या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत गौतमीने “आता लग्नाचा काही प्लॅन नाही जेव्हा असेल तेव्हा सांगेन पण आता माझ्या मागे का लागताय असे म्हटले होते. यावरून गौतमीचा लग्नाचा प्लॅन तर सध्या नाही हे स्पष्ट झाले होते. पण आता नव्याने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून गौतमीने स्वतःच आपला फ्युचर प्लॅन सांगितला आहे.

गौतमी पाटीलने @TheOddEngineer या युट्युबरला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या भविष्याविषयीच्या कल्पना सांगितल्या होत्या. गौतमीला भविष्यात काय करायचं आहे असे विचारताच त्यावर तिने, “मी आज ज्या पद्धतीने या क्षेत्रात आले तसं बाकी कोणत्या मुलीला करावं लागू नये यासाठी एक डान्स अकादमी सुरु करायची आहे” असे सांगितले होते. या व्हिडिओवर सुद्धा मला फसवून नाचायला लावलं असं लिहिलेलं आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
jansatta-bhupesh-baghel-interview
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची द इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडिया समिटच्या रायपूरमधील ‘मंथन’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती!

Video: गौतमी पाटील म्हणते, “मला फसवून डान्स करायला लावला”

हे ही वाचा<< गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर

दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांनी गौतमीच्या भावनेचे कौतुक केले आहे. तू आयुष्यात खूप सहन केलंय, सोसलंयस म्हणून तू आता इतरांविषयी विचार करतेस अशा कमेंट अनेकांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. तरीही काहींनी कमेंट करून गौतमीवर ताशेरे ओढले आहेत. जसे की काहींनी कमेंट करत, ” बाई तू कसली डान्सची शाळा उघडतेस आणि मुलींना काय तुझ्यासारखं नाचायला शिकवणार आहेस का” असेही म्हटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautami patil says i was cheated gets emotional future plan people say do not teach vulgar dance after viral video svs

First published on: 01-06-2023 at 11:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×