Viral Village Photo : परंपरा. परंपरा म्हणजे काय, तर पूर्वजांनी काढलेल्या प्रथा. परंपरेनुसार चालतं गेलं की, लोकं म्हणतात काय जुन्या विचारांचा आहे हा. पण, आज आपण कितीही पैसे कमवले तरीही चार दिवसांचे सुख हे आपल्या हक्काच्या गावच्या घरातच जाऊन मिळतं. जिथे परंपरा, चालीरीती जपल्या जातात. कोणताही दिखावा न करणाऱ्या या चार भिंतीच्या घरात गेल्यावर मोबाईला सुद्धा विसरून जातो. तेथील माणसांना, तेथील संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हेही नाकारून चालणार नाही, तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे.
गावी कोणताही कार्यक्रम असेल पंगतीत जेवण वाढण्याचा आणि तिथे पोटभरून जेवण्याची मजा काही वेगळीच असते. ताट म्हणून पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या वाढल्या जायच्या. द्रोण, बुंदी, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि आमटी, बुंदीचा लाडू, पाण्याचा ग्लास असं साधं पण सात्विक जेवण या ताटात वाढलं जायचं. मुंबईकर एकदा जेवतील तोपर्यंत गावची मंडळी ३ ते ४ वेळा भात घेऊन मोकळी व्हायची नाही का? तर आज एका इन्स्टाग्राम युजरने याच पंगतीचा फोटो शेअर केला आहे.
पैसे कमी पण माणुसकी खूप होती (Viral Video)
फोटोमध्ये मांडव घातला आहे आणि सगळी पुरुष मंडळी लाईनमध्ये जेवायला बसली आहेत. कोण मनापासून खातंय, कोण वाढतंय, कोण फोटोकडे बघून हसतंय. ही साधी पण लाखमोलाची आठवण खूप काही सांगून जातेय. हा फोटो@ roots_of_gaon इन्स्टाग्राम युजरच्या आजोबांच्या काळातील आहे. त्याने लिहिलेल्या कॅप्शननुसार या एका फोटोमध्ये त्याच्या आजोबांचं संपूर्ण आयुष्य सामावलं आहे आणि आजच्या धावपळीच्या काळात ही पिढी हळूहळू काळाच्या ओघात विरत चालली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @roots_of_gaon या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी फोटो पाहून “असे फोटो बघितले तर अंगावर काटा येतो ते दिवस आपण जगलोय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी”, “जेवण करताना कोणाच्या हातात मोबाईल नाही”, “जुने सोनेरी दिवस पुन्हा येणे नाही”, “हे दिवस खूप छान होते. पैसे कमी होते पण माणुसकी, प्रेम, आनंद आणि दुसऱ्याबद्दल आदर खूप होता”,”जग बदललं तरी संस्कृती बदलू नये” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
