India Post GDS Recruitment 2026 : टपाल विभागाने (Department of Posts) ‘इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक’ (GDS) भरती २०२६ अंतर्गत २३,७५७ रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती ‘GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्युल-II, जुलै २०२६’ अंतर्गत आणि जाहिरात क्रमांक १७-१२/२०२६-GDS द्वारे राबविली जात आहे. ही अधिसूचना २७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आली आहे. ‘वन-टाइम रजिस्ट्रेशन’ (OTR) प्रक्रिया ३१ ऑगस्टपासून सुरू होईल; तर उमेदवार २ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत अर्ज सादर करून शुल्क भरू शकतात.

ही भरती विविध टपाल मंडळांमधील (Postal Circles) शाखा पोस्टमास्तर (BPM), सहायक शाखा पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी असणार आहे.

इंडिया पोस्टमध्ये राज्यानुसार किती जागा रिक्त आहेत?

महाराष्ट्रात सर्वाधिक त्यानंतर तमिळनाडू आणि मग उत्तर प्रदेशमध्ये जास्त रिक्त जागा असणार आहेत.

महाराष्ट्र (मराठी) – २,२९७

तमिळनाडू (तमीळ) – २,११८

उत्तर प्रदेश (हिंदी) – १,६९१

पश्चिम बंगाल (बंगाली) – १,६१९

मध्य प्रदेश (हिंदी) – १,४५०

झारखंड (हिंदी) – १,३७९

केरळ (मल्याळम) – १,३७३

ईशान्य (North Eastern) (इंग्रजी/हिंदी) – १,३५४

ओडिशा (ओडिया) – १,३५३

कर्नाटक (कन्नड) – १,११६

बिहार (हिंदी) – १,०९८

महत्त्वाच्या तारखा

वन-टाइम रजिस्ट्रेशन प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहील.

अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वीकारली जाईल. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज भरू शकतात.

२३ आणि २४ सप्टेंबर रोजी अर्जातील चुका दुरुस्त करता येतील.

२७ ऑगस्ट २०२६ रोजी नोटिफिकेशन रिलीज होईल.

अर्जदारांकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे…

गणित व इंग्रजी विषयांसह इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे.
संबंधित स्थानिक भाषेचे ज्ञान असणे.
संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे.
सायकल चालविण्याचे कौशल्य असणे.

google trends

GDS भरतीसाठी उमेदवारांची निवड इयत्ता १० वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल. गुणांची गणना दशांश चिन्हानंतर चार अंकांपर्यंत केली जाईल. या भरतीसाठी कोणतीही स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नियुक्तीपूर्व इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.

निवड झालेल्या BPM (Branch Postmaster) उमेदवारांना शाखा पोस्ट ऑफिस चालविण्यासाठी स्वतःच्या खर्चाने राहण्याची व्यवस्था करावी लागेल. तसेच, त्यांना संबंधित शाखा पोस्ट ऑफिस असलेल्या गावातच राहणे आवश्यक आहे. ABPM (Assistant Branch Postmaster) आणि डाक सेवकांना संबंधित पोस्ट ऑफिसच्या टपाल वितरण क्षेत्रातच वास्तव्य करावे लागेल.