भारतात मोमोजची क्रेझ हळूहळू वाढत चालली आहे. दिल्ली असो किंवा मग मुंबई… कोलकाता असो की चेन्नई…. देशाच्या कानाकोपऱ्यात मोमोजप्रेमी वाढत आहेत. कुठे वाफेवरचे मोमोज आवर्जून खाल्ले जातात, तर काहींना पनीर मोमोज खूप आवडतात. मांसाहारी मोमोजची विक्रीही खूप आहे. मात्र याचदरम्यान सोशल मीडियावर एका नव्या प्रकारच्या मोमोजची जोरदार चर्चा सुरू आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती फायर मोमोज बनवताना दिसून येतोय.

मोमोज प्रेमींनी आत्तापर्यंत एस्टीम मोमोज, तंदूरी मोमोज, फ्राय मोमोज, पिझ्झा मोमोज खाल्ले असतील, पण तुम्ही कधी ‘फायर मोमोज’ खाल्ले आहेत का? नसेल तर सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात दिसतं की एक व्यक्ती मोमोजना चक्क आगीच्या ज्वालांमध्ये बनवताना पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ‘फायर मोमोज’ हे नाव ऐकून तुम्ही अवाक झाले असाल. नेमका हा काय पदार्थ आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
road accident video a young man survive from shocking accident
बापरे! नशीब बलवत्तर म्हणून मरता मरता वाचला; भरधाव वेगाने ट्रक समोर येताच तरुणाने… व्हिडीओ होतोय व्हायरल
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल

गाझियाबादच्या इंदिरापुरम मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर मिळणारे फायर मोमोज बनवले जात असून लोक अगदी दुरून इथे फायर मोमोज खाण्यासाठी येत आहेत. अलीकडे, ‘पैदाइशी फूडी पेज’ नावाचं पेज चालवणारा फूड ब्लॉगर हार्दिक मलिक याने या नव्या प्रकारच्या मोमोजचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. नुकतंच त्याने स्वतः सुप्रसिद्ध स्टॉलवर जाऊन या फायर मोमोजचा आस्वाद घेतलाय आणि व्हिडीओ शेअर करून या फायर मोमोजबाबत सर्वांना माहिती दिलीय. त्यानंतर या फायर मोमोजची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक व्यक्ती काही भाज्या आणि अनेक प्रकारचे सॉस, मसाले घालून मोमोज एका पॅनमध्ये गरम तेलात तळताना दिसून येतोय. हे मोमोज फ्राय केल्यानंतर त्यातलं तेल बाजुला काढतो आणि पुन्हा पॅनमध्ये आगीचा भडका लावून तळतो. मोमोजवर भडकलेली आग पाहून लोक आश्चर्य झाले आहेत.

या व्हिडीओला हजारो ९० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून जवळपास ८० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओपेक्षाही जास्त मजेदार यावरील कमेंट्स आहेत.एक युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, “हे फायर मोमोजे खाल्ल्यानंतर उद्या सकाळी तुम्हाला कळेल की काय होतं?” तर दुसर्‍या व्यक्तीनं लिहिलं, “फायर मोमोज खाल्ल्यानंतर टॉयलेट पेपरला आग लागते.” त्याचवेळी काही युजर्सनी लिहिलं की, “हे खाल्ल्यानंतर पोटाचा कॅन्सर नक्कीच होईल”. यासोबत सोशल मीडियावरील युजर्स फायर मोमोज बनवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक सुद्धा करत आहेत. कारण या खास प्रकारचे मोमोज बनवून तो बराच चर्चेत आलाय.

जर तुम्ही गाझियाबादमध्ये राहत असाल आणि तुम्हाला हे मोमोज खायचे असतील तर या दुकानाचं नाव तांजी मोमोज असं आहे. हे दुकान जयपुरिया मार्केटमध्ये आहे. असे विचित्र पदार्थ बनवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक दिवसांपासून असे विचित्र पदार्थाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यात आता या फायर मोजोजची भर पडलीय.