Funny viral video: जंगल म्हणजे फक्त प्राणी आणि झाडं नाहीत. तिथं रोज ताकद, धैर्य आणि समजुतदारीची परीक्षा होत असते. कधी सिंह जिंकतो, तर कधी त्यालाच माघार घ्यावी लागते. जंगलात खरा राजा कोण हे नावावर नाही तर त्या क्षणात काय घडतं यावर ठरतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरारक आणि मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरीही चकित झाले आहेत. या व्हिडीओत सिंहांचा संपूर्ण कळप एका हत्तीसमोर घाबरून पळताना दिसतो. ताकदीचा हा अनोखा सामना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ आफ्रिकेतील जंगलात शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सिंहांचा एक कळप झाडाच्या सावलीत निवांतपणे बसलेला दिसतो. कोणतीही हालचाल नाही, कुठलीही भीती नाही, पूर्णपणे शांतता असते. मात्र, अचानक जंगलात हत्तीची एंट्री होते आणि संपूर्ण चित्रच बदलून जातं.

व्हिडीओच्या सुरुवातीला काही सिंह खाली बसलेले दिसतात, तर काही आजूबाजूला नजर फिरवत असतात. ते इतके निवांत असतात की जंगलात त्यांच्याशिवाय कुणीच नाही आहे. पण, तेवढ्यात एक हत्ती हळूच त्यांच्या दिशेने येतो. हत्तीचा आत्मविश्वास, त्याची शांत चाल आणि तो दाखवत असलेला रुबाब पाहून सिंहांचा कळप क्षणात घाबरतो.

पाहा व्हिडिओ

ज्या सिंहांना जंगलाचा राजा म्हटलं जातं, तेच सिंह एकामागोमाग एक पळत सुटतात. कुठलाही सामना नाही, कुठलीही गर्जना नाही, सरळ पळत सुटतात. हत्ती मात्र कुठल्याही घाईशिवाय झाडाजवळ येतो, जणू काही घडलंच नाही अशा हेतूने. हे दृश पाहून जंगलातली खरी ताकद कोणाकडे आहे, हे स्पष्टपणे दिसून येतं.

हा व्हिडीओ makwavi_african_safaris या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “शेवटच्या सिंहाला तर समजलंच नाही, एवढ्यात काय झालं!”दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “कुटुंबासोबत होता म्हणून सिंहाने हुशारी दाखवली.” तर आणखी एक युजर म्हणतो, “एकटा सिंह जास्त धोकादायक असतो, पण इथे सगळ्यांनी पळणंच योग्य समजलं.”