सध्या सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मजेशीर असतात, तर कधी अंगाचा थरकाप उडवणारे असतात.साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो.जगात अनेक विषारी साप आहेत.ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं.तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पहिले असतील, तसेच अजगराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडलं तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असतं. अशाच एका महाकाय अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा महाकाय अजहार पाहून तुमचाही थरकाप उडेल. एका वृद्धाला महाकाय अजगराने मानेला घेरलं. त्याच्यापासून सुटका करणंही खूप कठिण झालं. एका वृद्धाच्या गळ्यात एक महाकाय अजगर दिसत आहे. तो त्याची गळचेपी करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अजगर किती मोठा आहे आणि त्याने वृद्धाचा गळा पकडला आहे. एक मुलगा अजगराला त्याच्या मानेतून सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला शक्य होत नाही. तेवढ्यात दुसरा मुलगा तिथे येतो आणि ते दोघे मिळून त्या माणसाच्या गळ्यातील अजगर काढण्याचा प्रयत्न करतात. पण सर्व प्रयत्न करूनही ते अजगर त्याच्या मानेतून निघत नाही. पाहा व्हिडीओ हेही वाचा - Video: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी… हा जगातील सर्वात लांब साप आहे आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक आहे. दरम्यान संपूर्ण व्हिडीओ पाहताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की…