scorecardresearch

बापरे! थेट सापासोबत भिडला इटुकला ससा; VIRAL VIDEO मध्ये पाहा कोणी जिंकली लढाई

यात एक ससा सापासोबत भिडताना दिसत आहे. दोघांमध्ये एवढी जबरदस्त मारामारी झाली आणि मग काय झालं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

snake-fight-video
(Photo: Instagram/predator.unity)

साप किती घातक असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या सापासोबत तुमचा सामना होतो तेव्हा परिणाम काय होईल, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र, सापाच्या आणि सश्याच्या लढाई जर झाली तर कोण जिंकेल? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ होत आहे. यात एक ससा सापासोबत भिडताना दिसत आहे. दोघांमध्ये एवढी जबरदस्त मारामारी झाली आणि मग काय झालं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ससा आणि सापाची जबरदस्त झुंज पाहायला मिळत आहे. हा साप बराच मोठा आहे, तरीही तो सशाला घाबरतो आणि त्याला टाळण्यासाठी इकडे तिकडे धावत असतो. पण, ससा पण इतका आक्रमक होतो की सापाला आपल्या तावडीतून सोडतच नव्हता. तो वारंवार सापाला तोंडात टाकून इकडे-तिकडे फेकत आहे. साप पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या साप आणि ससा यांच्यात अशी लढत तुम्ही क्वचितच पाहिली असेल.

आणखी वाचा : लडाखच्या पॅंगॉंग लेकमध्ये दारूच्या नशेत चालवली SUV, VIRAL VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मुलीची मदत करण्यासाठी खुर्चीवरून उठला, अन् नको ते घडलं, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ इ्न्स्टाग्रामवर predator.unity नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघून कोणाच्याही अंगावर शहारे उभे राहतील. हा व्हिडीओ आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, “किलर रॅबिट”. दुसऱ्याने लिहिले की, “सश्याला पाहून विश्वासच होत नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Giant snake fight with rabbit what happened next see shocking viral video prp

ताज्या बातम्या